देडगाव येथील कोकरे वस्ती वरील महादेव मंदिराच्या सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा ह भ प शिवानंद महाराज शास्त्री व पं .स .सदस्य वैशाली ताई एडके यांच्या हस्ते संपन्न.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील आदर्श कोकरे वस्ती वरील महादेव मंदिर समोरील सभा मंडपाचा भूमिपूजन सोहळा सकाळी 9 वाजता ह भ प शिवानंद महाराज शास्त्री श्री क्षेत्र पैठण व पंचायत समिती सदस्य वैशालीताई दादासाहेब एडके यांच्या हस्ते पार पडला.

        या महादेव मंदिर समोरील सभा मंडपासाठी माजी मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. सभापती सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाने व सौ . वैशालीताई दादासाहेब एडके यांनी वारंवार पाठपुरावा करून सभा मंडपास मंजुरी आणली. 

       या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, मारुती महाराज चेके, ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे ,ह भ प महेश हरवणे महाराज, ह भ प आसाराम महाराज पिसाळ , पोपट देवा कोकरे , ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे मा.संचालक बाजीराव पाटील मुंगसे, देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे, युवा नेते विकास राजळे , गणेश लोंढे व ब्राम्हणाच्या वेद मंत्रातून पुजा करत या संतांच्या व मान्यवरांच्या शुभ हस्ते नारळ फोडून सभा मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.

       आलेल्या मान्यवरांचे कोकरे परिवाराच्या व धनगर समाजाच्या वतीने सर्व साधुसंतांचे व प्रतिष्ठित मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. यावेळी राजीव कोकरे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून माजी मंत्री नामदार शंकरराव गडाख साहेब यांचे विशेष आभार मानत आम्हाला या सभामंडपाची गरज ओळखून आम्हाला सभा मंडप देऊन या मंदिराची शोभा वाढवली आहे .या मंदिराच्या वैभवात भर घातली आहे. आम्ही सर्व धनगर समाज आपला ऋणी राहीन.या शब्दात सर्वांचे अभिनंदन करत उपस्थितांचे आभार मानले.

         यावेळी कॉन्ट्रॅक्टर भिका भाऊ जगताप ,पांडू जगताप ,गणपत तात्या कोकरे ,युवा नेते निलेश कोकरे ,मा. सरपंच हरिभाऊ कोकरे, ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, सोसायटीचे विद्यमान संचालक रामनाथ गोयकर, विजय गोयकर ,बहादुर कोकरे साहेब ,पत्रकार युनूस पठाण, दादासाहेब एडके, गणेश मुंगसे सर, व आदी मान्यवर उपस्थित होते. बी पी एस न्युज प्रतिनीधी युनूस पठाण.