डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन,कृषी महाविद्यालय विळद घाट आयोजित ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2024 - 25 अंतर्गत पिंप्री अवघड गावात शेतकरी चर्चासत्र संपन्न .
*डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, कृषि महाविद्यालय विळद घाट आयोजित ग्रामीण कृषि जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत पिंपरी अवघड गावात शेतकरी चर्चासत्र संपन्न*-
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरंपच श्री. लहानु तमनर, कृषि सहाय्यक श्री. शरद लांबे, तलाठी भाऊसाहेब श्री.तुषार काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब लांबे, ग्रा.स. श्री सुरेश लांबे, प्रगतशिल शेतकरी श्री. रमेश दौंड तसेच कृषि महाविद्यालय विळदघाट चे मार्गदर्शक प्रा. डॉ. डी. पी. मावळे प्रा. के. एस. दांगडे, प्रा. एस. ए. मेघडंबर, तसेच विद्यार्थी व शेतकरी उपस्थित होते. हा उपक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर धोंडे, उपप्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत, प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
या शेतकरी चर्चासत्रात
1.मूदा व जलसंधारणाचे महत्त्व
2. कृषि विभागाच्या विविध योजना
3. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना
या विषयांवर सविस्तर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे यावेळी देण्यात आली. हा कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे कृषिदुत राहुल फलके, प्रतिक सागर, श्रीनाथ शितोळे, कृष्णा पवार, अजिंक्य पाटिल यांनी आयोजित केला होता.