सोनई पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदि आशिष शेळके यांनी पदभार स्विकारला.

सोनई पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदि आशिष शेळके यांनी पदभार स्विकारला.

खेडले परमानंद प्रतिनिधी

सोनई पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदि आशिष शेळके यांनी पदभार स्विकारला.

     सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून आज दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी शेवगाव पोलीस स्टेशन येथून बदली होऊन आलेले आशिष शेळके यांनी सोनई पोलीस ठाण्याचा पदभार ग्रहण केला. यापूर्वी कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांची एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बदली झाली असून त्यांचाही निरोप समारंभ पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांनी नवीन धोरणे अमलात आणून सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व्यवसायांना आळा घालणार असल्या संबंधीची माहिती दिली.शेळके यांनी त्यांच्या पुर्वीच्या ठिकाणी अनेक अवैध व्यवसायांना आळा घातला होता. अनेक गुन्हे देखील उघडकीस आणले होते. त्याच पद्धतीने याही ठिकाणी प्रलंबित असलेले गुन्ह्यांचा तपास आपण करणार असल्याचे शेळके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या वेळी सोनई प्रेस क्लब चे अध्यक्ष अविनाश राऊत, उपाध्यक्ष रवी शेटे, संभाजी शिंदे, विजय खंडागळे, गणेश बेल्हेकर, मोहन शेगर सह पत्रकार उपस्थित होते.