वंचित बहुजन आघाडीच्या भक्कम पाठींब्याने खाजगी सावकार - व निबंधकावर होणार -कार्यवाही

वंचित बहुजन आघाडीच्या भक्कम पाठींब्याने खाजगी सावकार - व निबंधकावर होणार -कार्यवाही

जय प्रबुद्ध भारत...जय भिम...जय रमाई...जय संविधान... वंचित बहुजन आघाडी,नेवासा.ता.-नेवासा,जि.-अहमदनगर. -(महाराष्ट्र राज्य).-"आयु.-कर्डक उदय संजय.-(नेवासा तालुका अध्यक्ष.)" -दि.-११-०६-२०२२./शनिवार.-(०३:०७ वा.दुपारी.)~मो.नं.-९७३०२०४४०३,९५६११८१२१२. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ १). खाजगी सावकार संजय लक्ष्मण कोळसे,प्रदिप दत्तात्रय तनपुरे त्याचबरोबर मध्यस्थी आण्णासाहेब भाऊसाहेब शेळके (सर) यांच्यावर सावकारकी गुन्हा दाखल करण्यात यावा. २).राहुरी न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ७६४/२०१७ न्यायप्रविष्ट असताना तत्कालीन दुय्यम निबंधक यांनी सदर गट नंबर १५६/३ व १५६/२ शेत जमिनीची खरेदी गोरक्षनाथ भानुदास हाडुळे रा.खडांबे,ता.-राहुरी,जि.-अहमदनगर यांच्या नावे केली या प्रकरणाची तत्कालीन दुय्यम निबंधक यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे. ३). पिडीत कुटुंबाची जमीन पडीक असताना तत्कालीन तलाठी यांनी पीक नोंद लावली कशी...? या तत्कालीन तलाठी यांची खातेनिहाय चौकशी करून या प्रकरणामध्ये दोषी असल्यास कठोर कारवाई करून निलंबित करावे. ४).तत्कालीन मंडल अधिकारी (सर्कल) यांनी पदाचा गैरवापर करून शेतजमीनीची राहुरी न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ७६४/२०१७ ने न्यायप्रविष्ठ असताना न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करून फेरफारची नोंद लावली आहे,ही नोंद रद्द करण्यात यावी व खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे. ५).संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑप.अर्बन सोसायटी अहमदनगर,शाखा-राहुरी बु!! येथे असलेल्या सेव्हिंग खाते क्रमांक १७६९ या खात्याचा तपशिल वेळोवेळी मागण्यास जाऊन देखील खात्याचा तपशिल देण्यास ४ वर्ष विलंब का लागला...? माझ्या खोट्या सहीनिशी देवाण-घेवाण करून माझी फसवणुक केली आहे.माझ्या सेव्हिंग खात्याचा खराखुरा तपशिल मला देण्यात यावा,म्हणुन शाखाधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करून खोटा तपशिल असल्यास शाखाधिकारी व कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे. ६).मौजे खडांबे बु!!,ता.-राहुरी,जि.-अहमदनगर येथील तंटामुक्ती अध्यक्ष जयसिंगराव माधवराव पवार व कमेटी सदस्य यांच्याकडे वेळोवेळी न्याय मागण्यासाठी गेलो असता उडवाउडवीचे उत्तरे देऊन खाजगी सावकारांना पाठीशी घालुन कुठल्याही प्रकारची दखल न घेता राहुरी न्यायालयात दिवाणी दावा क्रमांक ७६४/२०१७ ने न्यायप्रविष्ठ असताना या खाजगी सावकारांना खरेदीनुसार साक्षीदार झाले असुन ही न्यायालयाची फसवणुक आहे म्हणुन त्यांना सहआरोपी करून तंटामुक्ती अध्यक्ष पद रद्द करावे व कमेटी बरखास्त करण्यात यावी. ७).खाजगी सावकार,मध्यस्थी ही सर्व मंडळी राज्यमंत्री यांचे नातेवाईक असुन शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सत्तेच्या,पैश्यांच्या,गावगुंडाच्या जीवावर १०-१३ वर्षांपासुन माझे व माझ्या कुटुंबाचे शोषण करण्याचे काम ही मंडळी करत आहे आणि मला भुमीहीन आहे,तरी मला न्याय मिळावा.म्हणुन मी वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे माझी व्यथा मांडली व मला न्याय मिळण्याकरिता सदर आयु.~कर्डक उदय संजय.-(नेवासा तालुका अध्यक्ष) व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवुन मी व माझे कुटुंब दि.-०९-०६-२०२२ रोजी राहुरी तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत. ***********************************