नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथिल विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीत श्री बालाजी विकास पॅनल ने १३:० करीत दणदणीत विजय .

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथिल विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुकीत श्री बालाजी विकास पॅनल ने १३:० करीत दणदणीत विजय .

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत श्री बालाजी विकास पॅनल या सत्ताधारी गटाने१३ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.

         संपूर्ण नेवासा तालुक्याचे बालाजी देडगाव सोसायटी वर लक्ष लागले होते हि सोसायटी अतिशय तालुक्यात अग्रगण्य संस्था आहे. हि सभासदाचे हित जोपासणारी विश्वसनीय सहकार संस्था असुन महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख व लोकनेते मारूतीराव घुले पाटील संचलीत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रशेखर घुले पाटिल यांच्या नेतृत्वाखाली श्री बालाजी विकास पॅनल चे काम ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या अधिपत्याखाली झाले .काल मतदान होऊन या सोसायटीच्या निवडणूक रिंगणात १३जागेसाठी २६ उमेदवार उभे होते .या जागेसाठी दोन पॅनल मध्ये चुरशीची लढत होती.आमने-सामने उभे असणारे श्री बालाजी विकास पॅनल व श्री बालाजी शेतकरी परिवर्तन पॅनल मध्ये वेगळीच रंगत होती . जनतेने पुन्हा विश्वास दाखवला व श्री बालाजी शेतकरी परिवर्तन पॅनल ला धूळ चारून . श्री बालाजी विकास पॅनलच्या १३उमेदवारांना विजयी करून पुन्हा सत्ता सत्ताधार्यांकडे दिली.

      यावेळी विजयी सभा घेण्यात आली यावेळी माजी चेअरमन बाबासाहेब मुंगसे यांनी बोलतांना सांगितले की, आम्ही केलेल्या कामाची पावती मिळाली सभासदांनी आमच्यावर जो विस्वास दाखवला त्या ला तडा जाऊ देणार नाही . सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी मतदाराचे आभार मानले व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. व लक्ष्मण राव बनसोडे यांनी सर्वाचे जाहिर आभार मानले.

       या विजयांमध्ये देडगाव चे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक जनार्धन पा. कदम, प्रगतशील बागातदार शेतकरी बन्सी पाटील मुंगसे ( कांदे पाटील),माजी चेअरमन कारभारी पाटील मुंगसे, मार्केट कमिटीचे संचालक कडूभाऊ पाटील तांबे , ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मणराव बनसोडे, रघुनाथ कुटे पाटिल, माजी चेअरमन बन्सी कुटे,देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे ,विद्यमान उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, माजी सरपंच रामेश्वर गोयकर , ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे, पैल. हणमंत फुलारी ,माजी चेअरमन बाबासाहेब पाटील मुंगसे,मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे.बालाजी पाणीवाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे, बालाजी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, विश्वस्त सुभाष मुंगसे , युवा नेते संभाजीराजे काजळे, जनार्दन देशमुख,ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, प्रगतशील बागातदार शेतकरी विजय पाटील चेडे , व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे, निवृत्ती पाटील मुंगसे, युवा नेते किशोर वांढेकर , माजी सरपंच हरीभाऊ कोकरे, माजी चेअरमन शिवाजी बनसोडे, माजी चेअरमन आरूनराव बनसोडे,माजी चेअरमन योसेफ हिवाळे,, सात्यादन हिवाळे ,उत्कृष्ट व्यवसायिक हरिभाऊ तागड, रामनाथ गोयकर, बाळासाहेब मुंगसे , रज्जाक भाई पठाण व सर्व श्री बालाजी विकास पॅनल चे कार्यकर्ते यांनी मोलाचे कष्ट घेत घवघवीत यश संपादन केले.