एक अनोखा वाढदिवस, ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथील विद्यार्थ्याच्या वतीने अद्वितीय उपक्रम..
प्रतिनिधी नेवासा
फुलझाड लावून श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात अशुतोष निपुंगे
या विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा
वाढदिवस म्हटले की जल्लोष आलाच. केक कापणे, केक लावणे या गोष्टी येतातच. मात्र श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात एक आगळी वेगळी प्रथा सध्या जोरात सुरू आहे. ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे त्याच्या हस्ते एक झाड लावण्याचा अनोखा उपक्रम सध्या जोरात सुरू आहे.
आज बारावी सायन्स मध्ये शिकणारा अशुतोष निपुंगे या विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त यश संवाद विभागाच्या अरोमा कॉर्नरमध्ये एक फुलझाड लावण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापूरे, यश संवाद विभाग प्रमुख प्रा.देविदास साळुंके, पत्रकार मकरंद देशपांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोहन गायकवाड व मेजर पिराजी तागड हे उपस्थित होते .
आम्ही गेल्या दोन तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांचा अश्या प्रकारे वाढदिवस साजरा करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत. भविष्यात येणाऱ्या पिढीला याचा चांगला फायदा होईल व निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य जगणे सोपं होईल.
असे प्रतिपादन प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले.