तीर्थ क्षेत्र गुप्तेश्वर महादेव देवस्थान वडपाटी येथे महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..!!
येवला ( वडपाटी ) :- येवला तालुक्यातील राजापुर, ममदापूर येथील वडपाटी येथील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सालाबादप्रमाणे यंदाही वडपाटी येथे गुप्तेश्वर महादेव देवस्थान या ठिकाणी महाशिवरात्री महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय जय घोषणाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. राजापूर गावातून पायी दिंडी काढून थेट वडपाटी येथील गुप्तेश्र्वर महादेव मंदिरातपर्यंत दिंडी आली. तसेच मंदिरात अभिषेक करण्यात आला.तसेच भाविकांनी कोपरगाव येथुन पायी कावडीने पाणी आणुन मोठ्या उत्साहात वाजत गाजत कावडी मिरवणुक काढण्यात आली. पिंडीला अभिषेक स्नान घातले. प्रसंगी ह.भ.प माधुरी ताई शेरेकर सावरगावकर यांचे नामसंकीर्तन झाले. त्यांना महिला भजनी मंडळ यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आमदार नरेंद्र दराडे, माजी सभापती डॉ सुधीर जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तजन या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.आलेल्या भाविकांना महाफराळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन गुप्तेशवर महादेव मित्र मंडळ ममदापूर,राजापूर पंचक्रोशीतील तरुण मित्र मंडळांनी विशेष परिश्रम घेतले..