मारामारीच्या खटल्यातील आरोपींना नेवासा न्यायालयाने ठोठावली शिक्षा.
प्रतिनिधी-*:- नेवासा
नेवासा न्यायालय दंड अधिकारी अ.भा. निवारे मॅडम यांनी सलाबतपुर शिवारातील आरोपी शंकर हरिकीसन वाघ, विशाल पुंडलिक वाघ रेवनाथ पांडुरंग पवळ, यांनी एकत्रित जमाव जमवून फिर्यादि बाळासाहेब रावसाहेब निकम यांच्या शेतीतील गट नंबर -४६/१ मधील राहत्या वस्तीवर अनाधिकृत प्रवेश करून फिर्यादि व त्यांची मुलगी रुपाली बाळासाहेब निकम , मुलगा मंगेश बाळासाहेब निकम, पत्नी शोभा बाळासाहेब निकम, यांना दि.१/५/२०१६ रोजी सायंकाळी ७ वाजता आमच्या शेतात ट्रॅक्टर का घातला या कारणावरून आरोपी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. ट्रॅक्टरने माती लोटण्याचे काम काम चालू असताना आमच्या शेतात ट्रॅक्टर का घातला असे म्हणून आरोपी यांनी फिर्यादि यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच फिर्यादि बाळासाहेब निकम यांचा मुलगा मंगेश बाळासाहेब निकम ,मुलगी रुपाली बाळासाहेब निकम,व पत्नी शोभा बाळासाहेब निकम हे सोडवण्यासाठी गेले असता . त्यांना ही आरोपीं शंकर हरिकीसन वाघ, आरोपी रेवनाथ पांडुरंग पडवळ, तसेच शँकर वाघ यांचा पुतन्या विशाल पुंडलिक वाघ ,यांनी दगड व लोखंडी पाईपणे फियादी साक्षीदार यांना मारहाण केली .
त्यानुसार नेवासा पोलीस ठाण्या मध्ये गु. र.नंबर १००/१६ नोंदवण्यात आला होता.
त्यात मुळ तपास अधिकारी लक्ष्मण पवार यांनी नेवासा न्यायालयात
सदर केस बाबत
दोष आरोप पत्र दाखल केले. सदर खटल्यात सदर दोषारोप पत्र रे. फो.ख.३६/१७
नोंदवण्यात आला होता.
सरकारी वकील श्री राजीव तडवी तसेच सह सरकारी वकील सौ. एस. पी. औताडे.यांनी एकूण पुरावे ९ साक्षीदार तपासले .
मा-न्यायालयाने फिर्यादि बाळासाहेब निकम व जखमी साक्षीदार तसे वैद्यकीय अधिकारी डॉ बागवान यांची पुरावा ग्राह्य धरून आरोपीस भा. कलम 324,323,447,34 अनव्य दोषी धरत 10000(दहा हजार रुपये ) फिर्याद दिस नुकसानभरपाई व दंड कारव्हाई किंमत 1500 रुपये व चांगल्या वर्तुनिकीचे व एक वर्षचे चांगली वागणूक बंद पत्र प्रेत्येकी चांगल्या वागणूकीचे प्रत्येकी 15000 बंद पत्र ठोठावन्यात आला.
जिल्हा प्रवेक्षक अधिकारी यांना सदर आरोपी बाबत योग्य कारव्हाईसाठी आदेशीत करण्यात आले आहे.
तसेच सदर केसमध्ये पौरवी अधिकारी पो .हे .को राजू शंकर काळे, , पोलीस कॉन्स्टेबल सुभाष जगन्नाथ हजारे,पोलिस नाईक गणेश आढगळे ,महिला पोलीस कॉन्स्टेबल जोती नवगीरे, न्यायालयिन कामकाजात सहकार्य केले.