सचिन कुटे यांनी आयोध्या प्रयागराज काशी विश्वनाथ ते भामाठाण 1550कि.मि. प्रवास सायकल वर केला पूर्ण

नेवासा तालुका प्रतिनीधी
एखादी गोष्ट मनावर घेतली तर काहीही अशक्य नाही. याचा प्रत्यय सचिन कुटे सर या तरुणाला आला आहे. या तरुणाने 14 दिवसांत तब्बल 1550 किमी प्रवास चक्क सायकलने केला आहे. त्यांनी हा प्रवास करून नवा इतिहासच रचला आहे. त्याच्या या अनोख्या प्रवासाचे त्यांच्या नाते नातेवाईक मित्र परिवाराकडून कडून जोरदार कौतुक होत आहे.
नेवासा S कॉर्नर नेवासा बु|| चे सचिन कुटे ye या तरुणाने मनाशी खूणगाठ बांधत 14 दिवसांत केला एखादी गोष्ट करायची ठरविल्यास आपली मेहनत, जिद्द आणि धाडस असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे ते म्हणाले भामाठाम चे रामायणाचार्य गुरुवर्य अरुण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने मी ठरवलं की आपण सायकल प्रवास करायचा तो ही एकट्यानेच दररोज शंभर किमी पेक्षा जास्त सायकल चालवली.सकाळी 6 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सायकल चालवत, दररोज 100 किमी पेक्षा जास्त अंतर कापायचे व जवळपास 1550 किलोमीटर सायकल चालवण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी लागला. आपल्या प्रवासात अडचणी, वेदना सहन करत, प्रवास पूर्ण केला
कुटे सर यांचे उद्दिष्ट केवळ दर्शन नव्हते, तर ते एक विशेष संदेशही घेऊन आले आहेत.
कुटे सर म्हणतात की आजकाल लोक त्यांच्या व्यस्त दिनचर्येत आणि स्क्रीन टाइममध्ये इतके गुंतलेले आहेत की ते त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांना असे वाटते की लोकांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून व्यायाम करावा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहावे.तसेच सर्व प्रवसा दरम्यान राजेंद्र कुरुंद,प्रकाश जोशी,कोलते सर,आई वडील व माझ्या पत्नी यांनी नित्य फोन करून माझे मनोबल वाढविले..
मानसिक आरोग्यासाठी सक्रिय जीवनशैली आवश्यक त्यांनी त्याच्या तंदुरुस्तीचा पुरावा दिला नाही तर इतरांसाठी एक आदर्शही ठेवला.
त्यांचे प्रयत्न लोकांना प्रेरणा देतील की दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाने मोठी ध्येये साध्य करता येतात. कुटे सर यांचा असा विश्वास आहे की शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सक्रिय जीवन शैली खुप महत्वाची आहे
नेवासा फाटा येथे आल्यावर त्याचे भव्य आतिश बाजी करत स्वागत करण्यात आले मोठा मित्र परिवार जमा झाला होता प्रत्येकाने त्याचा सत्कार केला यावेळी गणेश वरखडे,सचिन गायकवाड, डॉ.मोहनराव कुटे,गणेश कुटे,रवींद्र कुटे,सखाराम शेळके साहेब,सचिन कुरुंद,हनुमान जाधव,राजेंद्र कुरुंद,आकाश भालेकर,प्रकाश जोशी, विनोद तेलतुंबडे,नितीन पाडळे,आत्माराम शिरसाठ,रितेश कराळे ,निलेश गायकवाड ,निलेश लवांडे,प्रवीण माकोने, अनिल परदेशी,अनिल शुळ,सचिन कुरुंद,अनिकेत मोकाटे इम्रान अत्तर व इतर मित्र परिवार उपस्थित होता.
त्यानंतर भामाठाम येथे रामायणाचार्य गुरुवर्य अरुण गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने अयोध्या,प्रयागराज, काशी विश्वनाथ वरून आणलेल्या गंगाजल ने अडबंगीनाथ तप शीळेचे पूजन, अभिषेक व आई वडील यांचे गांगजलाने पूजन करण्यात आले.