ऑलम्पिक चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून खेडले परमानंद येथील सर्वसामान्य कुटुंबातील युवकाची यशस्वी वाटचाल .
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी//संभाजी शिंदे
नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद येथील युवक मयूर अशोक फुलपगार या ध्येय वेड्या तरुणाचीऑलम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून यशस्वी वाटचाल.
अनेक राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये अग्र क्रमांक प्राप्त करून यशस्वी वाटचाल करणाऱ्या मयूरची हि घोडदौड ..
नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा सलग पाच किलोमीटर जलतरण स्पर्धेमध्ये या युवकाने तृतीय क्रमांक पटकावला .
सर्वसामान्य
कुटुंबातील असणाऱ्या मयूर याने आपल्या चिकाटी व जिद्दीच्या जोरावर जलतरण स्पर्धेमध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने त्याचा नागरि सन्मान करण्यात आला यावेळी खेडले परमानंद येथील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यामध्ये यामध्ये भाऊ केदारी, नयुम इनामदार ,पत्रकार संभाजी शिंदे , खिर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण एडके पशुवैद्यकडॉ होन अशोक फुलपगार आदी मान्यवर उपस्थित होते .