विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञानाचे धडे आवश्यक - डॉ. प्रकाश पवार .

विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञानाचे धडे आवश्यक - डॉ. प्रकाश पवार .

*विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञानाचे धडे आवश्यक... डॉ प्रकाश पवार*

           शिवांकुर विद्यालय बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त हवी यासाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी भाजीपाला खाऊचे दुकाने खाद्यपदार्थ इत्यादीचे दुकाने मांडली होती. या बाल आनंद मेळावा निमित्त विद्यालयात चित्रकला प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी व पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. पालकांनी विद्यार्थ्यांकडून खरेदी करून व्यवहाराची देवाण-घेवाण केली.

             या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विश्वस्त भास्कर पवार, उत्तमराव पवार, सचिव डॉ. प्रकाश पवार, अस्थिरोग तज्ञ डॉ प्रताप गिरगुणे खजिनदार डॉ. किशोर पवार, सौ मंगलताई पवार, युवराज पवार ज्योतीताई शेळके, पत्रकार कृष्णा गायकवाड. यांची उपस्थिती लाभली. . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता तारडे व आभार रोहिणी भाकरे यांनी केले. 

          या कार्यक्रमास शिवांकुर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया जाधव, पर्यवेक्षक अरुण खिलारी, किरण तारडे, सुनील लोळगे, सचिन जाधव, भाऊसाहेब करपे, विजय शिंदे, मयूर धुमाळ, प्रियंका पांढरे, सुवर्णा थोरात, शितल फाटक, सुजाता तारडे, रुपाली रासने, सुनीता ढोकणे रोहिणी भाकरे, प्रिया लांबे, अनिता लांबे, तनुजा झुगे, पल्लवी भालदंड व लिपिक, अर्चना पाळंदे, शिपाई शारदा तमनर, सिद्धेश्वर भोईटे,आदींसह बहुसंख्य पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.