आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून देडगाव येथील विविध विकास कामाचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न
*बालाजी देडगाव येथे विविध विकास कामाचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण ) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून विविध कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मा. सभापती सुनीता ताई गडाख यांच्या उपस्थितीत संपन्न.
आज आमदार शंकराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून शनी मंदिर देवस्थान येथे ब्लॉक बसविणे या कामाचा लोकार्पण सोहळा व देडगाव गावठाण रस्ता कॉंक्रिटीकरण करणे याचा लोकार्पण सोहळा तसेच तांबे वस्ती मोरांडी हा रस्ता डांबरीकरण यांचा लोकार्पण सोहळा तसेच दळवी वस्ती चर्च चे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन सोहळा माजी सभापती सुनीताताई शंकरराव गडाख व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी सुनिताताई गडाख म्हणाल्या की, आत्तापर्यंत देडगाव परिसरात अनेक मोठी मोठी कामे पूर्ण झालेली असून अजूनही कामाचा तडाखा चालूच आहे. देवस्थान साठी सभा मंडप , रस्त्याची कामे, वॉल कंपाऊंड व विविध विकास कामे पूर्ण झालेली आहेत. गावाच्या कोणत्याही अडीअडचणीत आमदार शंकरराव गडाख खंबीरपणे उभे राहतील. व जनतेच्या सेवे साठी तत्पर राहतील कधीही फोन करा व कामे सांगा आम्ही दिलेला शब्द पाळतोच .अशा अनेक विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.
भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ह भ प सुखदेव महाराज मुंगसे, मुळा बँकेचे चेअरमन माणिकराव होंडे,मा. सभापती कारभारी चेडे ,सरपंच चंद्रकांत मुंगसे, मा. चेअरमन कडूभाऊ तांबे, राजाराम महाराज मुंगसे,लक्ष्मणराव बनसोडे ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्धन कदम ,बन्सी मुंगसे, रामेश्वर गोयकर, उपसरपंच महादेव पुंड, चेअरमन बाबासाहेब मुंगसे, चंद्रभान कदम, निवृत्ती मुंगसे, देवराव मुंगसे, योसेफ सेफ हिवाळे, श्रीकांत हिवाळे, आनंद दळवी, कडूभाऊ दळवी, पाणी वाटप संस्थेचे चेअरमन संतोष तांबे ,बाळासाहेब मुंगसे , अशोक मुंगसे, दत्ता पाटिल मुंगसे, कडू भाऊ दळवी, ग्रामपंचायत सदस्य विश्वास हिवाळे,महेश चेडे,व्हाईस चेअरमन रामनाथ गोयकर, भारत कोकरे , सुभाष मुंगसे ,वसंत मुंगसे,व आदी मान्यवर शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
या सर्व कार्यक्रमाचे सरपंच चंद्रकांत मुंगसे व ग्रामस्थांनी नामदार शंकरराव गडाख यांचे अभिनंदन केले आहे.
देडगाव परिसराच्या वतीने सुनिताताई शंकरराव गडाख यांचा विकासकामाबद्दल सन्मान करण्यात आला.