श्रीरामपूर येथे होणाऱ्या संगीतमय गाथा आणि भव्य कीर्तन महोत्सवाच्या ठिकाणी धर्म ध्वजाची स्थापना
किशोर भगत
येत्या रविवार 13 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या गाथा संगीतमय गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या मंडपाची उभारणी तसेच धर्म ध्वजाची स्थापना शुक्रवार 4 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी या भव्य दिव्य कार्यक्रमाची संकल्पना करून ती प्रत्यक्षात प्रत्यक्षात साकार करण्यासाठी अहोरात्र झटत असलेले हरिभक्त परायण आचार्य डॉक्टर शुभम महाराज कांडेकर यांनी या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगितली . जगदगुरु तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला ३७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळ संगीत गाथा पारायणाचे आयोजन केले आहे असे ते म्हणाले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे प्रभात, उद्योग समूहाचे किशोरजी निर्मळ, प्रसिद्ध उद्योजक जितु भाऊ तोरणे , पत्रकार तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी मंडपाचे उभारणीची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून आणि आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते धर्म ध्वजाची स्थापना करुन करण्यात आली. याप्रसंगी बोलताना आमदार लहुजी कानडे म्हणाले कि , एवढा मोठा उपक्रम श्रीरामपूरकरांसाठी भूषणावह्आहे ,त्याचप्रमाणे या कार्यक्र्मा मुळे सर्व वारकरी तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त एकत्र येऊन समाज एकसंघ होण्यास मदत होते आणि अनेक सामाजिक उपक्रमांना चालना देता येते . यावेळी प्रभात समूहाच्या वतीने किशोर अण्णा निर्मळ यांनी बोलताना सांगितले हा उपक्रम खरोखरच आज काळाची गरज आहे आणि या उपक्रमासाठी सर्वतोपरी सहाय्य आपण सर्वांनी केले पाहिजे . आमदार लहुजी कानडे तसेच इतर मान्यवरांनी मंडप उभारणी च्या कामाचा आढावा घेऊन सर्वत्र पाहणी केली आणि काही सूचनाही मांडल्या. हरिभक्त परायण डॉक्टर शुभम महाराज कांडेकर यांच्या अथक परिश्रमातून उभ्या होत असलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातून सहकार्य येत असून भाविक भक्त तसेच वारकरी संप्रदाय मधून या कार्यक्रमासाठी मोठा उत्साह दिसत आहे रविवार 13 ऑक्टोबर रोजी सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात नामवंत कीर्तनकार उद्धव महाराज मंडलिक त मोहन हिरवे महाराज बेलापूरकर , संजय महाराज पाचपोर आदी किर्तनकार कीर्तन रुपी सेवा रुजू करणार आहे. रोज सकाळी संगीत गाथा पारायण त्यानंतर प्रवचन , संध्याकाळी ६ ते ८ किर्तन आणी त्यानंतर दररोज महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम असेल . रविवार २० ऑक्टोबर रोजी श्री दत्त पिठ देवगडचे महंत भास्कर गिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल .