माननीय समाजसेवक अधिकराव चनै यांनी केले डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

माननीय समाजसेवक अधिकराव चनै यांनी केले डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त  विनम्र अभिवादन.

सांगली जिल्ह्यातील समाजसेवक तसेच राष्ट्रीय जनता दल प्रवक्ता ( महाराष्ट्र राज्य )माननीय अधिकराव चनै यांनी सांगली येथील भारती हॉस्पिटल मध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले तसेच डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले.या कार्यक्रमावेळी माननीय अधिकराव चनै यांनी आपले मनोगत व्यक्त करतानासांगितले की डॉक्टर पतंगराव कदम अतिशय कमी कालावधीत गोरगरिबांचे कैवारी म्हणून नावलौकिक मिळवला होता. 285 पलूस -कडेगाव मतदारसंघातील लोकांचा साहेबांना मोठा पाठिंबा होता विरोधकांना बोलण्याची संधी त्यांनी मिळू दिली नाही एवढा विकास त्यांनी मतदारसंघात केला होता . कमी वयात राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी साहेबांनी जनतेचा विश्वास संपादन केला होता . विकास करणार मगच मतदान मागणार असा त्यांचा मानस होता . एसटी संचालक बॉडी वर असताना गावागावात एसटी पोहोचवून खेडेगावातील जनतेची होणारी गैरसोय दूर केली . शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून पुण्यामध्ये साहेबांनी सुरुवातीला शाळा सुरू केली होती. भारती या नावाने संस्था स्थापन करून भारती विद्यापीठ स्थापन केले यामध्ये भारती हॉस्पिटल ,भारती बँक ,भारती बाजार ,भारती मेडिकल  , इंजिनियर कॉलेज ,लॉ कॉलेज त्यांनी सुरू करून भारती समूह एक वटवृक्ष बनवले आहे.त्यांच्या हजार शाखा पूर्ण भारतभर आपणास पाहायला मिळत आहे .डॉक्टर पतंगराव कदम यांनी गोरगरिबांची मुलं आपल्या संस्थेत कामाला लावली आहे शैक्षणिक शुल्क माफ करून गरीब घरातील मुले डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत.

      

           सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोनसळ हे डॉक्टर पतंगराव कदम यांचे जन्मगाव. आमदार ते महसूल मंत्री , वनमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री होऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.लागेल तेथे निधी उपलब्ध करून विकास कामासाठी पलूस- कडेगाव तालुका सांगली जिल्ह्यात स्वतंत्र केला.सोनहिरा सहकारी साखर कारखाना, सागरेश्वर सहकारी सूतगिरण उभे करून गोरगरिबांचे कल्याण केले व स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.एम आय डी सी उभारून नवतरुणांना उद्योग उभारणीस मदत करून उद्योग उभारणीस निधी उपलब्ध करून दिला.पलूस- कडेगाव तालुक्यामध्ये ताकारी आणि टेंभूचे पाणीघाटमाथ्यावर आणून लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली त्यामुळे पलूस-कडेगाव भाग हा सुजलाम सुफलाम झाला.प्रशासकीय कामासाठी खेड्यापाड्यातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून तहसीलदार व प्रांत कार्यालय कडेगाव येथे निर्माण केले .न्यायालय, सुसज्ज सरकारी आरोग्य हॉस्पिटल,औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले तसेच इतर सरकारी कार्यालय कडेगाव तालुक्यात चालू केले .डॉक्टर पतंगराव कदम यांच्या कृपेमुळे महाराष्ट्रात व इतर राज्यात कडेगाव तालुका हा अव्वल ठरलेला आहे असे मत माननीय अधिकराव चनै यांनी व्यक्त केले आहे.