भोकरचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र रेणुकामातेच्या यात्रात्सोवास आज सोमवार दि. 29 पासून आरंभ, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल व पो.नि.दशरथ चौधरी यांचे हस्ते पुजन.

भोकरचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र रेणुकामातेच्या यात्रात्सोवास आज सोमवार दि. 29 पासून आरंभ, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल व पो.नि.दशरथ चौधरी यांचे हस्ते पुजन.
भोकरचे आराध्य दैवत श्रीक्षेत्र रेणुकामातेच्या यात्रात्सोवास आज सोमवार दि. 29 पासून आरंभ, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल व पो.नि.दशरथ चौधरी यांचे हस्ते पुजन.

             भोकर (वार्ताहर) - श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील आराध्य दैवत व जागृत देवस्थान श्री क्षेत्र रेणुकामाता अर्थात जगदंबामाता देवस्थानची यात्रा आज सोमवार दि.29 एप्रील व उद्या मंगळवार दि.30 एप्रील या दिवशी होत आहे. आज सोमवार दि. 29 एप्रील रोजी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांचे हस्ते रथाचे पुजन व महाआरतीने यात्रेस आरंभ होत आहे. या यात्रेच्या निमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी या यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव कमेटी व समस्त ग्रामस्थ भोकर यांनी केले आहे.

                सालाबाद प्रमाणे यावर्षीही चैत्र कृष्ण पंचमीपासून म्हणजेच आज सोमवार दि.29 एप्रील पासून सुरू होत आहे. भोकर येथे श्रीक्षेत्र माहुरगड निवासीनी रेणुका मातेचे भव्य मंदिर व समोर भव्य दिपमाळ आहे आहे. मंदिर प्रांगणात वृक्षमालांची सजावटीला यात्रोत्सव काळात विद्युत रोषणाई केली जाते. येथे दरवर्षी चैत्र कृष्ण पंचमीच्या रात्री चंद्रोदय समयी येथील रेणुकामातेच्या ‘तकतराव’ नामक हत्तीची प्रतीकृती असलेल्या रथाची मिरवणुकीने यात्रेस आरंभ होत आहे, पौराहित्य योगेश दंडवते हे करत आहेत.

               त्याप्रमाणे यावर्षीही सोमवार दि. 29  एप्रीलच्या पहाटे 5 वा. लोकनियुक्त सरपंच सौ. शितलताई प्रताप पटारे या दाम्पतयाचे हस्ते येथील रेणुका मातेचा गोदावरी नदीवरील जलाने जलाभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वा. पुरण,पोळी नैवैद्यार्पण व महाआरती होत आहे. सायंकाळी 6.30 वा. तकतराव नामक रथाची महापुजा व आरती श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व सरपंच सौ.शितलताई प्रताप पटारे दाम्पत्यांचे हस्ते व गावातील प्रमुख मान्यवरांचे उपस्थीतीत विधीवत पुजन व महाआरती ने मिरवणुकी व शोभा यात्रेस आरंभ होत आहे.

                या मिरवणुकीत डीजेसह बँड पथकही सहभागी होतात. या दरम्यान गावातील मुख्य चौकाचौकात फटाक्यांची आतिषबाजी व शोभेच्या दारूची आरास केली जाणार आहेे. तसेच डीजे व बँड पथकाच्या तालावर तरूणाईसह अबालवृद्ध सहभागी होवून नाचत या मिरवणुकीत सहभागी होवून भाविक रथ ओढतात. या रथाचे चौकाचौकात पुजन केले जाते. त्यानंतर मंगळवार दि. 30 एप्रील रोजी दुपारी 4 वा. कुस्त्यांचा हगामा भरविला जाणार आहे. या हगाम्यात मोठ्या संख्येने राज्यस्तरीय मल्ल हजेरी लावत असतात.

                 या दरम्यान येथे विविध प्रकारचे खेळणी, रहाट पाळणे, नानाविधी वस्तुंची विक्रीची दुकाने या बरोबर मेवा मिठाईची दुकानेही थाटली जातात. या वेळी गावातील प्रत्येक कुटूंबाकडून रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवैद्य अर्पण केला जातो. तसेच अनेक भाविक नवसपुर्तीही करतात. त्यात गुळाची शेरणी सह विविध प्रकारे नवसपुर्ती केली जाते. यात्रोत्सवाचे निमीत्ताने गावातून नोकरी, व्यावसायानिमीत्त बाहेरगावी गेलेले कुटूंब, माहेररवासीनींसह पै पाहुण्यांच्या उपस्थीतीने यात्रोत्सवात उत्साहात भर टाकली जाते. 

                  मंगळवार दि. 30 एप्रील रोजी गावातील मुलींसह महिला व अबालवृद्धही या दिवशी मेवा मिठाईसह खेळणी व विविध वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी करतात. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास येथे कुस्त्यांचा जंगी हंगामा भरविला जाणार आहे. या हंगाम्यात जिल्ह्यासह राज्यातील मान्यवर मल्ल हजेरी लावत असतात. 

                 अशा प्रकारे संपन्न होणार्‍या या यात्रात्सोवास मोठ्या संख्येने सहभागी होवून यात्रात्सोवाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व यात्रात्सव कमेटी भोेकर यांनी केले आहे.