मा. नामदार शंकरराव गडाख यांच्या वतीने नूतन देडगाव सोसायटीच्याअध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकाचा सन्मान
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील काल झालेल्या निवडीत सोसायटीच्या अध्यक्षपदी महेश लक्ष्मणराव कदम उपाध्यक्ष रामभाऊ नाथा कोकरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे . मा. मृदू जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या नेतृत्वाखाली बालाजी शेतकरी विकास हा पॅनलने 13 पैकी 13 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला होता.
आज सोनई येथे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, व सर्व संचालक यांचा या तालुक्याच्या भाग्यविधात्या मा. सभापती सौ .सुनीताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते शाल व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सूनीताताई गडाख यांनी नूतन निवडीबद्दल शुभेच्छा देत .!! विना सहकार नाही उद्धार !! म्हणत बालाजी देडगाव येथील सोसायटी ही अतिशय पारदर्शक व अग्रगण्य काम करणारी तालुक्यांतील मोठी सोसायटी असल्याने अध्यक्ष व संचालकावर खूप मोठी जबाबदारी असते . व हि संस्था सर्व सभासदांच्या मालकीची असून सर्व सभासदांना योग्य तो न्याय देऊन योग्य ती कर्जाची वाटप करून सभासदांचे हित जोपासावे. म्हणत सर्व नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांना शुभेच्छा देत यांचे अभिनंदन केले.
यांनतर सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी सर्वांचे स्वागत करत नेहमीचं गडाख कुटुंबीयांच प्रेम देडगाव करावर आहे. व विकास हाच ध्यास या कुटुंबाचा असतो. वेळोवेळी ग्रामपंचायत निधी संदर्भात असतील व नामदार निधीतून असेल गावाला अनेक शासकीय निधि
देत गावचा विकास होण्यास मोठा वाटा यांचा आहे. या शब्दात नामदार शंकरराव गडाख यांचे अभिंदन केले.
या सत्कार समारंभ प्रसंगी प्रगतशील बागातदार शेतकरी बन्सी पाटील मुंगसे, देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे,माजी सरपंच दत्ता पाटील मुंगसे, नूतन सोसायटीचे अध्यक्ष महेश लक्ष्मणराव कदम, उपाध्यक्ष रामभाऊ नाथा कोकरे, बाबासाहेब पाटील मुंगसे,योसेफ हिवाळे , संजय मुंगसे,चाइल्ड करीयर इंग्लिश स्कूल चे संस्थापक सागर बनसोडे ,कचरू तांबे, रामभाऊ गोयकर, अरुण मुंगसे, जनार्दन देशमुख, बाळासाहेब कदम, अशोक कदम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे, बालाजी देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त सुभाष मुंगसे, बाळासाहेब मुंगसे व युवा नेते गणेशभाऊ लोंढे व आदी मान्यवर उपस्थित होते.