नेवासा येथील आषाढ वद्य एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने सूचना व नियोजन

नेवासा येथील आषाढ वद्य एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन त्याचप्रमाणे पार्किंग व्यवस्था यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने सूचना व नियोजन

तीर्थक्षेत्र नेवासा येथी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वद्य वारीच्या यात्रेच्या निमित्ताने पार्किंग व्यवस्थेत मोठा बदल.

 

तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वद्य एकादशी निमित्ताने भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा , पोलीस निरीक्षक विजय करे , मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास गरकळ यांनी  पार्किंग च्या ठिकठिकाणी जाऊन वाहतूक कोंडी च्या दृष्टीने आज दि १९ रोजी पाहाणी करुन त्या दृष्टीने नियोजन केले. 

माऊलींच्या होणाऱ्या आषाढीवद्य वारीच्या निमित्ताने सहा ते सात लाख भाविक नेवासा शहरात येण्याची  शक्यता आहे या दृष्टीने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासना कडून पार्किंग व्यवस्थे मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे यामुळे पार्किंग व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आली आहे . 

१) नेवासा नेवासा फाटा कडून येणारी दुचाकी वाहन पार्किंग जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा व सेव्हन डे इंग्लिश स्कुल बस स्थानक जवळ.

२) नेवासा नेवासा फाटा व खडका फाटा कडून येणारी चारचाकी वाहनांची पार्किंग कृषी उत्पन्न बाजार समिती ( मार्केट कमेटी )आवार. व नामदेव नगर कृष्णा हॉटेल समोर. 

३) नेवासा श्रीरामपूर कडून येणारी वाहनांची पार्किंग 

    श्री विश्वेवर नाथबाबा विद्यालय नेवासा बुद्रुक.

    

४) खुपटी, निभारी, पानेगावं, मांजरी , उस्थळ दुमाला या रस्त्याने कडून येणारी वाहनांची पार्किंग जामदार मळा ईदगा जवळ . 

अशा पद्धतीने विविध ठिकाणी पार्किंग करण्यात आली आहे जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच 

वाहनांचा अडथळा होणार नाही यासाठी मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली आहे त्यासाठी कोणीही रस्त्यांवर या दिवशी वाहने लावणार नाही या दृष्टीने सर्वांनी काळजी घ्यावी यासाठी चौकाचौकात बंदोबस्त दिला जाईल बेशिस्त वाहनावर कारवाई देखील करण्यात येईल आपली वाहने पार्किंग मध्येच लावावी असे आव्हान यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले आहे .

  शहरातील व्यवसाईकांनी आपली वाहने व दुकानातील सामान यात्रेच्या दिवशी दुकानांसमोर रस्त्यावर लावु नयेत याची दक्षता पाळावी जेणे करून वाहतुकीला अडथळा येणार नाही असे आव्हान नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांनी या वेळी केले आहे.