आबासाहेब काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांची उचल फाउंडेशन ला क्रांतीदिनी अनोखी भेट.
*आबासाहेब काकडे विद्यालयातील विद्यार्थ्यांची उचल फाउंडेशन ला क्रांती दिनी अनोखी भेट
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी,
आव्हाणे बु :आबासाहेब काकडे विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी छात्र प्रबोधन पुणे यांच्या वतीने आयोजित वर्ग उद्दिष्ट स्पर्धेअंतर्गत स्व कमाईतून १५०० रुपयाची रक्कम जमा करत शेवगाव मधील ब्राह्मण गल्ली येथे असलेले उचल फाउंडेशन येथील अनाथ ३५ विद्यार्थ्यांसाठी सिलिंग फॅन ची अनोखी भेट दिली.प्रकल्प प्रमुख श्री. सचिन खेडकर, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग ,पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड , सौ. मीनाक्षीताई शिंदे , छात्र प्रबोधन दूत श्री. योगेश तायडे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी श्री. सचिन खेडकर व प्राचार्य संपतराव दसपुते यांच्याहस्ते ही भेट स्वीकारली. यावेळी श्री सचिन खेडकर यांनी उचल फाउंडेशन चा इतिहास सांगितला. विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती आपुलकी निर्माण व्हावी व आपणही समाजाचे काही देणे लागतो हा हेतू मनात निर्माण व्हावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाबद्दल आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अॅड.डॉ. विद्याधरची काकडे साहेब, जि .प .सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री लक्ष्मणराव बिटाळ , पर्यवेक्षक श्री. सुनील आव्हाड, पर्यवेक्षिका श्रीम. पुष्पलता गरुड या सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.