महात्मा फुले कृषी विद्यापीठातील महिला मजुरांच्या तक्रारीची डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल .
*महात्मा फुले कृषी विद्यापीठातील महिला मजुरांच्या तक्रारीची डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल*
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे संशोधन विभागातील अधिकाऱ्यांकडून महिला मजुरांवर लैंगिक अत्याचार होत असलेल्या बाबतची तक्रार शिवसेनेचे महिला पदाधिकारी यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव यांना दिलेली आहे.
अहमदनगर येथे विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे या लाडकी बहीण योजना सन्मान योजनेच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख ऍड.उज्वला भोपळे नगर दक्षिण प्रमुख,डॉ. शबनम इनामदार तसेच राहुरी तालुका प्रमुख वनिता जाधव यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन या महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीची मागणी डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली.
यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील काम करणाऱ्या दहा ते बारा महिला गेला 13 वर्षापासून द्राक्ष विभागात काम करत होत्या परंतु गेल्या दोन-तीन वर्षापासून द्राक्ष विभागाकडे नव्याने बदलून आलेले कृषी सहाय्यक सिताराम बाचकर हे महिलांसोबत गैरवर्तन करत होते.
महिलांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विद्यापीठाने विशाखा चौकशी समिती नियुक्ती केली आहे. त्या समितीमध्ये सात सदस्य आहेत अशी माहिती विद्यापीठाकडून समजली. तथापि, नियुक्त चौकशी समितीमध्ये सक्षम महिला अधिकाऱ्यांचा समावेश करावा.तसेच तक्रारदार महिलांची इन कॅमेरा जबब नोंदविण्यात यावे. ज्या सेवाभावी संस्थांनी महिलांच्या विषयी कामकाज केलेले आहे अशा सेवाभावी संस्थांचा यामध्ये प्राधान्य समावेश करावा. असे मत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
याबाबत महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घालून, महिलांना न्याय मिळून द्यावा, असे त्यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सूचित केले आहे.