अहमदनगर जिल्ह्यातील ता.राहुरी डिग्रस येथे जिल्हा गौन खनिज पथकाच्या कार्यवाहीतील जप्त वाळन साठा झाला पसार ...
अहमदनगर जिल्हयातील राहुरी तालुक्यातील डिग्रस हद्धीत चोरटी वाळू साठा दि.२३.७.२०२२ रोजी अहमदनगर येथील जिल्हा गौन खनिज पथकाने कार्यवाही केली असता त्यानंतर रात्रीतून त्यातील वाळू गायब करून पून्हा वाळूचोरांनी पहाटे ट्रॅक्टर व केनिच्या सहाय्याने वाळू काढली याचा अर्थ येथील मंडल अधिकारी वांबोरी यांचे मोठे गोडबंगाल ( झांगडगुत्ता ) असल्याचे निदर्शनास आले आहे आशी स्थानिक नागरीक व अधिकाऱ्यांमध्ये मोठीचर्चा सुरू आहे गेल्या अनेक महीन्यांपासून डिग्रस व बारागाव नांदूर शिवारातून राजरोस पने चोरटी वाळू मोठया प्रमाणात सुरू आहे येथील नागरीक यामुळे खूप त्रस्त झाले आहेत या गावांतील रस्त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे अधिकारी पन वाळूतस्करांना मदत करत आहेत येथील वाळू लिलावासाठी ग्रामसभेचा ठराव ( पॉझीटीव्ह ) होता परंतू लिलाव न करताच या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वाळूतस्करी अगदी जोमात सुरू आहे .
जिल्हा गौन खनिज पथकाने डिग्रस मुळा नदीद्धधीतच कार्यवाही दाखवली तर समोरच असलेले बारागाव नांदूर हद्धीमधील वाळूचे मोठे ढीगारे बघून कार्यवाही करण्यास मंडल अधिकारी बारागाव नांदूर महिला कर्मचारी यांना सांगितले मा.तहसिदारीलदार श्री शेख साहेब यांचे गौन खनिज पथक किति सक्षम आहे आशी देखील चर्चा मोठया प्रमाणात सूरू आहे.
डिग्रस.बारागाव नांदूर.येथे ( वाळू ) तर राहुरी कारखाना.वांबोरी खडी मशिन. कनगर येथे दगड व मुरूम तस्करी मोठया जोमात सूरू आहे यावर प्रशासनाची डोळेझाक सामान्य नागरीकांचे काय ?
कोण कार्यवाही करणार या धंद्यांवर
तालुक्यात (दारूचे ) धंदे मोठया प्रमाणात सुरू आहेत कोण करणार कार्यवाही काय होणार सामान्य माणसाचे ?