बजरंग दलाचे रहात्यात भव्य शौर्य संचलन.

बजरंग दलाचे रहात्यात भव्य शौर्य संचलन.

गीता जयंती व शौर्य दिनानिमित्त राहात्यात भव्य शौर्य संचलन व त्रिशूल दीक्षा कार्यक्रम.

राहाता | प्रतिनिधी - प्रसाद घोगरे//९३७०३२८९४४.

गीता जयंती व शौर्य दिनाच्या पावन मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भव्य शौर्य संचलन व त्रिशूल दीक्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता, श्री. सावता महाराज मंगल कार्यालय, राहाता येथे पार पडणार आहे.

गीता जयंतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर हिंदू समाजावर शतकानुशतके झालेल्या अन्यायाच्या काळानंतर, हिंदू समाज एकत्र येऊन आपल्या पराक्रमाची व सांस्कृतिक ओळखीची पुनर्स्थापना करत आहे. अयोध्येत भव्य प्रभू श्रीरामलल्ला राष्ट्रमंदिर उभारणी हा त्याच संघर्षाचा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू तरुणांमध्ये शौर्य, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि संघटनाची भावना रुजविणे हा आहे.
त्रिशूल दीक्षेद्वारे तरुणांमध्ये हिंदू समाजाबाबत जागरूकता निर्माण करून समाजरक्षणाचा संकल्प व्यक्त करण्यात येणार आहे.

शौर्य संचलनाच्या माध्यमातून हिंदू समाजाची एकजूट, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक अस्मिता समाजासमोर ठळकपणे मांडली जाणार आहे.
कार्यक्रमासाठी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांतून बजरंग दलाचे कार्यकर्ते, हिंदुत्ववादी संघटना, मित्रमंडळे व स्वाभिमानी हिंदू तरुण मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रमास सर्व राष्ट्रभक्त, स्वाभिमानी हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल, उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.