लोणी येथे ‘अखंड भारत दिन’ उत्साहात साजरा
लोणी येथे ‘अखंड भारत दिन’ उत्साहात साजरा
प्रतिनिधी// प्रसाद घोगरे 9370328944.
लोणी येथे देशभक्त नागरिकांच्या उपस्थितीत ‘अखंड भारत दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोणी खुर्द बाजारतळ येथे भारत मातेच्या फोटोला पुष्प हार अर्पण करून व मशाल पेटवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर लोणी खुर्द व लोणी बुद्रुक गावातून भव्य मशाल फेरी काढण्यात आली.
फेरीचा समारोप म्हसोबा मंदिर लोणी बुद्रुक येथे झाला. येथे देशभक्तीपर घोषणा, देशभक्त गीत सादर करण्यात आले तसेच अखंड भारताच्या इतिहासातील महत्वाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी वक्ते म्हणून शिर्डी येथील विराटजी पुरोहित व देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








