भाजपचं सौगात-ए-मोदी कॅम्पेन, ३२ लाख गरीब मुस्लिमांना रमजान ची भेट_नेमकं काय..?

भाजपचं सौगात-ए-मोदी कॅम्पेन, ३२ लाख गरीब मुस्लिमांना रमजान ची भेट_नेमकं काय..?

भाजपचं सौगात-ए-मोदी कॅम्पेन, ३२ लाख गरीब मुस्लिमांना रमजान ची भेट_नेमकं काय..?


प्रतिनिधी_प्रसाद_घोगरे_९३७०३२८९४४.

सविस्तर_मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान ईद निम्मित भाजपकडून मुस्लिमांसाठी स्पेशल गिफ्ट दिले जाणार आहे.

भापच्या अल्पसंख्यांक विभागातर्फे रमजान ईद निमित्ताने, गरीब मुस्लिमांना ३२ लाख किटच वितरण करण्यात येणार आहे.

भाजपचे म्हणणे आहे की गरीब मुस्लिमांना आनंदात आणि उत्साहात ईद साजरी करण्यात यावी यासाठी ह्या अभियानाची सुरुवात करण्याचे ठरले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथून ह्या अभियानाची सुरुवात होणार असून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा व भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या मार्गद्शनाखाली ३२ हजार कार्यकर्ते सौगात-ए-मोदी कीटचे वाटप करणार आहेत, प्रत्येक कार्यकर्त्यांकडे मशिदिंची जबाबदारी देऊन, ते किट धर्मगुरू मार्फत गरीब मुस्लिमांनपर्यंत पोहोचवण्याचं काम भाजप करणार आहे.


नेमके काय आहे भाजपचं सौगात-ए-मोदी किट.

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान ईद निमित्ताने, भाजपचं सौगात-ए-मोदी किट मध्ये....


• खाद्यपदार्थ, मिठाई, खजूर, शेवई,  साखर, ड्रायफ्रूट.


• महिलांचे किट मध्ये पंजाबी ड्रेस चे कापड.


• पुरुषांशांच्या किट मध्ये कुडता आणि पायजमा कापड.


• प्रत्येक जिल्ह्यात ईद मिलाद कार्यक्रम.

• ६०० ते ७०० रुपये प्रत्येक किट चां खर्च.

सौगात-ए-मोदी वर अनेकांनी आपले मत व्यक्त केले आहेत...

"बटेंगे तो कटेंगे" पासून चा प्रवास “सौगात - ए - मोदी” पर्यंत येऊन पोहोचला आहे..
अयोध्या पौळ..

मोदीजी, आम्हा मुस्लिमांना कोणत्याही प्रकारच्या सौगात-ए-मोदी किटची आवश्यकता नाही,फक्त तुमच्या राजकीय फायद्यांसाठी, जे देशात मुस्लिमांसाठी द्वेष पेरलं जात आहेत, ते सर्व बंद करा हीच आमच्या मुस्लिमांसाठी ईद निमित्त सर्वात मोठी भेट असेल.

मीरखान पठाण..


विधानसभा व लोकसभा निवडणुकीत, मुस्लिमांनी जिहादी फतवा काढून, भाजपला भरघोस मतांनी निवडून आणल्याबद्दल भाजपा व मोदींनी मुस्लिमांना सौगात-ए-मोदी गिफ्ट दिलंय त्याबद्दल मनापासून अभिनंदन.
चिन्मय मांडलेकर..