कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १६.८० लाख रुपयांची गोवंश ताब्यात.

कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १६.८० लाख रुपयांची गोवंश ताब्यात.

कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेली १६.८० लाख रुपयांची गोवंश ताब्यात.

अहिल्यानगर प्रतिनिधी _ प्रसाद घोगरे ९३७०३२८९४४.

जिल्ह्यातील अवैध कत्तलधंद्यावर धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राशीन (ता. कर्जत) येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेली ₹16,80,000/- किंमतीची 26 गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत. सदर जनावरे विना अन्न-पाण्याने, निर्दयपणे बांधून ठेवण्यात आले होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केली.

कारवाईचा तपशील:

दिनांक 12 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. श्री. दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, राशीन गावात सचिन मोहन आढाव आणि हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात बबलु उर्फ इरफान कुरेशी व त्याचे साथीदार गोवंश जनावरांना डांबून ठेवले आहेत.

पथकाने तात्काळ छापा टाकत घटनास्थळावरून 26 जिवंत जनावरे जप्त केली असून, कोणतीही कत्तल होण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली.

फरार आरोपी:

1. हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव (रा. राशीन)
2. सचिन मोहन आढाव (रा. राशीन)
3. बबलु उर्फ इरफान कुरेशी (रा. राशीन)
4. सादीक कुरेशी (रा. कर्जत)
5. समीर कुरेशी (रा. कर्जत)

वरील आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 417/2025 अन्वये महाराष्ट्र पशूसंवर्धन अधिनियम 1956 अंतर्गत आणि प्राण्यांना क्रूरपणे वागविण्याचे कायदे लागू करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

सहभागी पथक:

पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, आणि अरुण मोरे यांनी ही कारवाई केली.

जिल्हा पोलीस प्रशासनाने जनतेस आवाहन केले आहे की, कुठेही अशा प्रकारच्या अवैध हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. गोवंश रक्षणासाठी कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही.