ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन यांनी घेतला 93 व्याअल्पवयीन मुलीचा शोध

12/11/2025

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

 *ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिस स्टेशन पथकाने घेतला 93व्या अल्पवयीन मुलीचा शोध* 

दिनांक 01 11 2025 पासून सुरू असलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलिसांची कारवाई 

   * तालुक्यातील अल्पवयीन मुलगी वय 14 वर्ष ही घरात झालेल्या भांडणामुळे रागाच्या भरात घर सोडून गेली होती. तिचा शोध घेऊन राहुरी पोलिस तपास पथकांनी ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या ताब्यात दिले 

          दि.08/11/2025 रोजी सकाळी 10.00वा. वा चे सुमारास फिर्यादी यांची 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहते घरातून कोणाला काही एक न सांगता रागाच्या भरात निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) प्रमाणे दाखल केल्याने सदर मुलीचा राहुरी पोलिस स्टेशन पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात आज दिनांक 12.11.2025 रोजी सुस्थितीत देण्यात आले आहे .

     सदर कारवाई मा. सोमनाथ घारगे पोलिस अधीक्षक सो, अहिल्यानगर , मा. सोमनाथ वाघचौरे अपर पोलिस अधीक्षक श्रीरामपूर , मा. जयदत्त भवर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई गणेश वाघमारे, पो हे कॉ / बाबासाहेब शेळके पो नाईक/ बागुल पुंड,पो कॉ / अमोल भांड , पोकॉ / पोकॉ/ इफ्तेखार सय्यद , यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास पोसई / गणेश वाघमारे सह रायटर पोकॉ / इफ्तेखार हे करीत आहेत.

      सदर गुन्ह्याबाबत तसेच इतर काही माहीती दयावयाची असल्यास श्री. पोनि, संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन संपर्क - 8788891147 वर माहिती द्यावी

         ( संजय आर ठेंगे )

         पोलीस निरीक्षक

       पोलीस स्टेशन राहुरी