लोहगाव येथील ढेरे कुटुंबाला आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने मदतीचा हात.अपने तो अपने होते है ही गोष्ट पहावयास मिळाली.

लोहगाव येथील ढेरे कुटुंबाला आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या वतीने मदतीचा हात.अपने तो अपने होते है ही गोष्ट पहावयास मिळाली.

प्रतिनिधी:- संभाजी शिंदे खेडले परमानंद नेवासा

आपल्या माणसांना आपली माणसंच मदत करणार 

जगात कुठेही जा आपले ते आपलेच !

लोहोगावातील गाई मृत झालेल्या ढेरे कुटूंबाला आ शंकरराव गडाख व मित्रमंडळाचा मदतीचा हात.

मा खा यशवंतराव गडाख यांच्या हस्ते 1लक्ष 50 हजार रुपयांची मदत सुपूर्द.

लोहोगाव ता नेवासा येथील रोहिदास जनार्धन ढेरे या गोपालकाच्या गेल्या आठवडाभरात तब्बल 22 गाई मयत झालेल्या असल्यामुळे ढेरे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.एका एका मागोमाग अनेक गाई मृत पावत असल्याने ढेरे कुटूंबासह परिसरात भीतीचे व दुःखाचे वातावरण आहे.दुःखाचा डोंगर कोसळलेल्या ढेरे कुटूंबियांची मा मंत्री शंकरराव गडाख यांनी लोहोगाव येथे भेट घेऊन त्यांना धीर दिला होता व शासन स्तरावरील मदतीसाठी प्रयत्न करू त्याचप्रमाणे स्वतः व शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने आर्थिक मदत देऊ असा शब्द दिला होता त्यानुसार शुक्र दि 30 सप्टेंबर 2022 रोजी मा खा यशवंतराव गडाख यांच्या शुभहस्ते मुळा कारखाना सोनई येथे 1 लक्ष 50 हजार रुपयांची देणगी ढेरे कुटूंबाचे सदस्य रोहिदास ढेरे,रामदास ढेरे,सारंगधर ढेरे,कुशीनाथ ढेरे यांचेकडे सुपूर्द केले.

यावेळी बोलताना मा खा यशवंतराव गडाख म्हणाले एकाच वेळी मोठ्या कष्टाने संगोपन केलेल्या 22 गाई मृत झाल्याने ढेरे कुटूंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

या संकटातुन बाहेर निघण्यासाठी आधार मिळावा या हेतूने आ शंकरराव गडाख व मित्रमंडळाच्या वतीने 1. लक्ष 50 हजार रुपये देणगी दिली आहे ढेरे कुटुंबाने संकटातून हतबल न होता जिद्दीने उभे राहावे आम्ही सर्व आपल्या बरोबर आहोत असेही मा खा गडाख म्हणाले.इतरांनाही मदतीचे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर,जबाजी फाटके,संजय जंगले संचालक मुळा सह सा कारखाना सोनई,नानासाहेब रेपाळे,भाऊसाहेब राजळे मा सरपंच,बाप्पूराव कल्हापुरे उपसरपंच,रामनाथ कल्हापुरे ,बन्सी ढेरे,आण्णासाहेब ढेरे,निसार सय्यद, जालिंदर ढेरे,दत्तात्रय तनपुरे,विकास राजळे,चांगदेव ढेरे,डॉ पोपट ढेरे,हरी ढेरे,राजू कचरे,ज्ञानदेव ढेरे,राजेंद्र कचरे,योगेश ढेरे,राजेंद्र शिरसाठ, दादा घुले,अमोल ढेरे,संतोष ढेरे,पोपटराव पाटोळे, आण्णासाहेब वाघ आदींसह ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभापती सुनीलराव गडाख व युवा नेते उदयन गडाख यांनीही भेट देऊन ढेरे कुटूंबास आधार दिला.

लोहोगाव ता नेवासा येथील गाई मृत पावलेल्या ढेरे कुटूंबास रोख स्वरूपात देणगी देतांना मा खा यशवंतराव गडाख व मान्यवर उपस्थित होते

एकाच वेळी तब्बल 22 गाई मृत पावल्याने ढेरे कुटूंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे तरी सर्वांनी आप आप आपल्या परीने ढेरे कुटूंबास मदत करावी संकटावर मात करत ढेरे कुटूंब निश्चित उभे राहील असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मा. खासदार यशवंतराव गडाख. यांनी केले.