बालाजी देडगाव येथे आरोग्य उप केंद्रात बालकांच्या नियमित लासीकरणाला मोठा प्रतिसाद.

बालाजी देडगाव येथे आरोग्य उप केंद्रात बालकांच्या नियमित लासीकरणाला मोठा प्रतिसाद.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी) आज सोमवार दि.६ रोजी नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आरोग्य उप केंद्रात महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या सोमवारी लहान बालकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणुन नियमीत लसीकरण मोहीम राबवली जाते. या लसी करणासाठी बालकांचा व मातांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

       यामध्ये प्रामुख्याने BCG, Penta, OPV, PCV, IPV, Rota, MR1, MR2, MR Boaster इ .लसीकरण केले जाते. या नियमीत लसीकरण साठी उप केंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अजित गवळी, आरोग्य सेवक प्रवीण चराटे व आरोग्य सेविका अनिता सूर्यवंशी मॅडम कायम आपली जबाबदारी पार पाडत असतात. अशा कर्तव्य दक्ष कर्मचाऱ्यांचा परीसरात कौतुक होत आहे. अशा चांगल्या कामाबद्दल गावाचा आरोग्याचा विकास निश्चित होइल. असा नागरिकांना विश्वास आहे.

       आज सोमवार च्या या लसीकरणासाठी आरोग्य उपकेंद्राचे

समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ अजित गवळी ,

आरोग्य सेविका-श्रीम. आनिता सूर्यवंशी 

आशा सेविका-श्रीम कोल्हे, श्रीम गोफणे,श्रीम कदम, श्रीम मुंगसे,श्रीम लीला शिंदे यांनी विशेष परिश्रम घेत ही लसीकरण मोहीम यशस्वी पार पाडली.