एटीएम ची अफरा तफर करून पैसे चोरणारा मध्यप्रदेश येथील आरोपी जेरबंद, राहता पोलिसांच्या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक.

एटीएम ची अफरा तफर करून पैसे चोरणारा मध्यप्रदेश येथील आरोपी  जेरबंद, राहता पोलिसांच्या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतुक.

   सविस्तर_राहता शहरातील मैड हॉस्पिटल समोरील असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेले इसमाचां विश्वास संपादन करून, त्यांच्याकडे असलेल्या एटीएम ची हात चलाखीने अफरा तफरी करून त्यांच्या एटीएम मधून २२.००० रुपये काढून घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी, राहता पोलीस स्टेशन येथे, १६/०१/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात येवुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्याकडे होता.

          वरील गुन्हाच्या तपास सुरू असताना दिनांक ०२/०३/२०२५ रोजी सायकांळी ०६/०० वाजण्याचे सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे माहीती पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना मिळाली, ते तत्काळ वरील ठिकाणी स्टाफ सोबत जाऊन, शिताफीने संशयित इसमला ताब्यात घेतले असता त्याचे नाव दिपक राजेद्र सोनी वय 35 वर्षे, भोपाळ, मध्यप्रदेश असे असल्याचे समजले.

          सदरील इसमाची अधिकची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय वाढला, त्यामुळे त्याची झडती घेतली असता सदर आरोपींकडे वेगवेगळ्या बँकांचे ६९ एटीएम मिळून आले. तसेच दोन फेवीक्वीक देखील मिळुन आले असुन त्याने एटीएमची अफरातफर करुन फसवणुक करून पैसे काढत असल्याचे कबुल केले, तसेच सदर आरोपीने वरील गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न देखील झाले असुन त्यास दिनांक - ०२/०३/२०२५ रोजी अटक करण्यात येवुन मा. न्यायालयाने त्यास दिनांक ०७/०३/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिलेली असुन तपास सुरु आहे. सदर ६९ एटीएम हे वेगवेगळ्या शहरातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

          मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला व अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. वैभव कलुबमें तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री.शिरीष वमने यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेले मार्गदर्शन व सुचनां प्रमाणे राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, सफो / प्रभाकर शिरसाठ, पोहेकाँ/ अशोक झिने, पोहेकों/श्रीकांत नरोडे, पोना / विनोद गंभीरे, होमगार्ड शेलार गुन्हे उघडकीस आणला आहे.

          राहता पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे परराज्यातील आरोपी अटक झाला आहे, त्यामुळे पोलिसांच्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होतांना दिसत आहे.