कै. तात्या बाबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहीहंडी उत्सव साजरा.
*कै.तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहीहंडी उत्सव साजरा*
" हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की" जय घोष, श्रीकृष्ण व राधा यांची विद्यार्थिनीनी केलेली आकर्षक व मनमोहक वेशभूषा दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लावले जाणारे थर अशा उत्सवाच्या वातावरणात गुणवत्ता , संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून लौकिक असणारी कै.तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका या शाळेमध्ये दहीहंडी उत्सव सालाबाद प्रमाणे यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दहीहंडी चा मनमुराद आनंद लुटला.'गोविंदा आला रे आला' या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला .बालगोपालांनी मनोरा रचून दहीहंडी फोडली. दरम्यान गोपालकाला म्हणजे अध्यात्मिक सामाजिकता, एकता आणि व्यवस्थापन कौशल्य दाखवणारा सण आहे. तसेच उत्साह व मांगल्याचे प्रतीक असलेला सण आहे . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकता व व्यवस्थापन हा गुण वाढीस लागावा, संस्कार व संस्कृती टिकावी म्हणून शाळा या उपक्रमाचे आयोजन करत असते . संस्थेचे अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे यांच्या हस्ते दहीहंडीची पूजा करण्यात आली. याचवेळी पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. याचवेळी पालक श्री राजेंद्र आघाव, विशाल पुंड, जालिंदर चेके , अमोल लोंढे, गणेश पुंड, राणी लोंढे आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेच्या संचालिका श्रीमती मीना बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षिका श्रीमती सोनाली बर्फे,मनीषा काळे,जयश्री पाटेकर, शलाका पवार रविंद्र निकम यांनी परिश्रम घेतले.