शिक्षण महर्षी साहेबरावजी घाडगे पाटील यांचा अभिष्टचिंतन गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न.
शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील यांचा अभिष्टचिंतन गौरव सोहळा संपन्न
भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
आव्हाणे बु : त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल शेवगांव व तेलकुडगांव व ढोरजळगांव यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगांव संकुलात त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी श्री साहेबरावजी घाडगेपाटील साहेब यांचा 69 वा अभिष्टचिंतन गौरव सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी संपन्न झाला.मुख्य गेटवर सत्कारमूर्ती साहेबरावजी घाडगेपाटील व अध्यक्षा ॲड सुमतीताई घाडगेपाटील यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले व प्रभू दत्ताची पुजा करून सनई चौघडा,अश्व,लेझीम,परेड संचलन व बॅन्ड पथकासह वाजत गाजत पदसंचालन करण्यात आले. उपस्थित सर्वांचे औक्षण करून 69 व्या अभिष्टचिंतन प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 1069 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.अमर जवानास पुष्पचक्र अर्पण केले तसेच भव्य त्रिमूर्ती हाॅलचे उद्घाटन करण्यात आले.या अभिष्टचिंतन गौरव सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा ॲड सुमतीताई घाडगेपाटील ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून दिनेश लव्हाट पाटील,संस्थेचे सचिव मनिष घाडगेपाटील,तेलकुडगांव सोसायटीचे चेअरमन अरूणराव घाडगेपाटील,मा सरपंच गोरक्षनाथ घोडेचोरपाटील,ग्रा पं सदस्य व सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घोडेचोर पाटील,पोलिस पाटील शिवाजी घोडेचोर पाटील,व्हा चेअरमन म्हातारदेव काळे पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काळे पाटील,संचालक काकासाहेब काळे पाटील,अशोक काळे पाटील,प्रगतशील शेतकरी अशोकराव शेटे पाटील,अरविंदराव घाडगे पाटील, जनार्दन गटकळ पाटील,मोहनराव शेटे पाटील, संचालक दयाधनराव गटकळ पाटील,हरिश्चंद्र काळे पाटील, सखाराम काळे पाटील, दिगंबरराव काळे पाटील, दानियल साळवे,एकनाथ महाराज घोडेचोर, विनोदशेठ गुगळे,भाऊसाहेब शेंडगे, बापू साळवे,कडुबाळ तेलधूने, ढोरजळगांव चे मा सरपंच एकनाथराव कराड,सुखदेव भाऊ कराड,पाराजी बुटे,अनंता उकिर्डे पाटील,वृद्धेश्वर अर्बन पतसंस्थेचे चेअरमन महादेव पाटेकर पाटील,पत्रकार निळकंठ कराड , पत्रकार दिपकराव खोसे,पत्रकार राम साळुंके,पत्रकार सुरेश पाटील,मराठा महासंघाचे भाऊसाहेब भुसे गुरूजी,शेतकरी संघटनेचे दत्ताजी फुंदे,प स शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम शैलजा राऊळ, विषयतज्ञ त्रिंबकराव फाफाळ साहेब,अपुर्व पेन्टस चे संचालक बाळासाहेब सातपुते पाटील, वल्लभशेठ लोहिया,अशोकराव डमाळ पाटील,शरदराव खोसे पाटील,विकास बडे,सिनिअर महाविद्यालय प्राचार्य मनोज घाडगेपाटील,तेलकुडगांव संकुलाच्या मुख्य प्रशासक श्रीम मनिषा राऊत,प्राचार्य भाऊसाहेब दुधाडे, ढोरजळगांव च्या प्राचार्या श्रीम अंजली फलके,त्रिमूर्तीनगर पब्लिक स्कूल प्राचार्य सचिन कर्डिले,त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूल प्राचार्य जितेंद्र पाटील, नामदेव ताके, प्रचार्य आशिष भारती, प्राचार्य श्रीमंत काळे, तेलकुडगांव, ढोरजळगांव व तेलकुडगांव येथील सर्व शिक्षक, शिक्षिका सेवक वृंद,पालक,ग्रामस्थ, बालसैनिक व बालसैनिका आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तिन्ही संकुलाअंतर्गत क्रिकेट,कबड्डी,खो खो, व्हाॅलीबाॅल,चित्र,रांगोळी, निंबंध,वक्तृत्व इ स्पर्धेत क्रिकेट स्पर्धेत मुलांमध्ये ढोरजळगांव संकुल विजयी संघाला,मुली शेवगांव विजयी संघाला तर कबड्डीमध्ये मुले मुली तेलकुडगांव विजयी संघाना शिक्षणमहर्षी आदरणीय साहेबरावजी घाडगेपाटील साहेब फिरता चषक देऊन गौरविण्यात आले.यावेळी शिक्षणमहर्षी साहेबरावजी घाडगेपाटील यांच्या अभिष्टचिंतन समवेत संकुलातील बालसैनिक व बालसैनिकांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला.या गौरव प्रसंगी निळकंठ कराड, भाऊसाहेब शिंदे,दिनेश लव्हाट पाटील यांनी घाडगेपाटील साहेब यांना आपल्या मनोगतातून उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती साहेबरावजी घाडगेपाटील साहेब यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष त्रिमूर्ती परिवाराच्या ॲड सुमतीताई घाडगेपाटील यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे मुख्य प्रशासक बाळासाहेब कोकरे यांनी केले,सुत्रसंचलन प्राचार्या श्रीम सरिता जगताप यांनी केले तर उपस्थितांचे प्रा ज्ञानेश्वर खरड यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेवगांव संकुलातील सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षिका व सेवक वृंदानी विशेष परिश्रम घेतले.शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झा
ली.