रामनवमीच्या पूर्वसंध्येला नेवाशात तणावाचे वातावरण ? मिरवणुकीला लागले गालबोट.

प्रतिनिधी :-नेवासा

रामनवमीच्या पूर्व संध्येला निघालेल्या मिरवणूक दरम्यान काही तरुण हे झेंडा फडकवत असल्याने समोरा समोर काही काळ नेवासा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सुरू असलेल्या मिरवणुकीला गालबोट लागले. यामुळे रामभक्तां मधून संतापाची लाट पहावयास मिळाली. काही वेळानंतर पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला होता. 

सदरील प्रकाराबाबत पोलीस हवालदार तुळशिराम भानुदास गिते नेमनुक नेवासा पोलीस ठाणे, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, काल दि .०९ रोजी दुपारी १४. ३० वा कंपनी चालक महिला पोलीस कॉन्स्टेबल मनिषा धाने यांनी कळविले की, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना गोपनिय माहिती प्राप्त झाली आहे की, नेवासा खु शहरामध्ये सायंकाळी 6 वाचे दरम्यान हिंदु समाजाच्या वतीने सालाबाद प्रमाणे काही लोक श्रीराम नवमी निमीत्त श्रीराम प्रतिमा शोभा यात्रा काढणार आहेत. तरी कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी बंदोबस्त कामी ७.०० वा हजर रहा असा संदेश प्राप्त होतास आम्ही पोलीस ठाणेस हजर झालो. 

आम्ही 6 वा सपोनि थोरात सोबत होम/बोरुडे, महोम/शेख महोम आगळे, महोम सरोदे, पोहेक मरकड, होमगार्ड देवकर, मोटे, शेख, हुशार,

महोम रासकर असे श्रीराम प्रतिमा शोभा यात्रा बंदोबस्त कामी रवाना झालो. मळगंगा कंप्लेक्स नेवासा खु याठिकाणी 6.३० वाचे सुमारास शोभा यात्रा सुरु झाली. 

सदर शोभा यात्रेमध्ये १००० ते १२०० लोक हजर होते. व डिजे लावण्यात आलेला होता. सदर शोभायात्रेबाबत आयोजक श्री मनोज पारखे यांना शोभायात्रेची परवानगी घेतली किंवा कसे याबाबत विचारपुस केली असता. त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. 

सदर शोभायात्रेचे आयोजक अंकुश पंढुरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप इ. असल्याचे सांगितले. सदर शोभायात्रेमध्ये रथावरती प्रभु रामचंद्राची फोटो लावण्यात आलेला होता. शोभायात्रा एस टी स्टन्ड येथुन खोलेश्वर गणपतीकडे घेवुन जात असताना रस्त्याच्या उत्तरेकडील

बाजुस असलेल्या किस्मत टी व ज्युस या दुकाना समोरील रस्त्यावर काही मुस्लीम तरुण हातामध्ये हिरव्या रंगाचे कापड बांबुला बांधुन जोर जोराने हालवत होते.

 ते पाहुन शोभा यात्रेतील हिंदु तरुण त्यांचेकडे धावत जावुन वाद घालु लागले तेवढयात मी व इतर स्टाप तेथे पोहचलो झेडा घेतलेल्या मुलांना मी ओळखले ते रहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार हे होते. आम्ही त्या मुलांचे हातातुन झेंडा काढुन घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मला धक्काबुक्की केली म्हणुन मी माझे मोबाईलमधुन त्यांचे चित्रण करीत असताना त्या- तरुणा पैकी रेहान शेख याने माझा मोबाईल हिसकावुन घेवुन मोबाईल फोडुन नुकसान

केले व माझे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. 

त्यानंतर ते सर्वजण तो झेंडा घेवुन तेथुन पळुन गेले. त्यावेळी मला समजले की जमावातील कोणीतरी अल्ताफ ख्वाजा बागवान वय 15 वर्ष रा लक्ष्मीनगर नेवासा यास कोणीतरी काहीतरी डोक्यात मारुन जखमी केले असुन

त्यास काही लोकांनी परस्पर दवाखान्यात घेवुन गेले आहेत. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर जोरदार गोंधळ करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजुस असलेल्या दुकानादारांनी

आपआपली दुकाने भितीने बंद केली. 

त्याच वेळी रस्त्यावरुन येणारी जाणारी वाहने व रस्त्यावरील लोक यांचेमध्ये प्रचंड पळापळ झाली त्यानंतर

पोलीसांनी जमलेल्या जमावाला तेथुन पांगवले तरी दि ०९ रोजी हिदु समाजातील आयोजक मनोज पारखे, अंकुश पंढुरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप यांनी विनापरवाना श्रीराम नवमी निमित्त शोभायात्रा काढून त्यामध्ये डिजे लावण्यात आला तसेच इसम नामे

रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार यांनी गैर कायदयाची मंडळी जमवुन हिरव्या रंगाचा झेडा फडकावुन सार्वजनीक रस्त्यावर हिंदु समाजातील तरुणाबरोबर वाद निर्माण केला व मी सरकारी कर्तव्य करत असताना माझे बरोबर वाद घालुन धक्काबुक्की केली. तसेच माझा मोबाईल फोडुन नुकसान केले. आणी सरकारी कामामध्ये

अडथळा आणला. तसेच हिंदु समाजातील औंकार जोशी, दिपक परदेश , कष्णा डहाळे, बाळासाहेब कोकणे, व इतर ६० ते ७० लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर गोंधळ करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

म्हणुन माझी वरील सर्वांविरुद्ध भा .द. वि. ३५३,

३२४,१४३,१४७,१४९,४२७,३२३ , १८८सह क्रिमीनल अमनमेंट क्ट कलम ७ प्रमाणे फिर्याद आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार हे करत आहे . 

सदरील घटनेनंतर शहरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवंगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, यांच्या सह पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी हे पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत.