हरवलेले 2 लाख 50 हजाराचे 23 मोबाईल फोन राहरी पोलिसांनी तक्रारदारांच्या केले स्वाधीन.
*हरवलेले २ लाख ५० हजाराचे 23 मोबाईल फोन राहुरी पोलिसांनी तक्रारदारांच्या केले स्वाधीन*
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडे बाजार, बसस्टॅन्ड इतर गर्दिच्या ठिकाणाहुन गहाळ झालेले मोबाईल फोनची गहाळ रजिस्टरला नोंद घेवून अधिकचा तपास करण्यासाठी सदर मोबाईल बावत अधिक माहिती संकलीत करुन नगर उत्तर सेल पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आले वरील गहाळ झालेल्या मोबाईलचा अधिक तपास करुन गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेवुन आज दिनांक २६/०९/२०२४ रोजी गहाळ झालेल्या मोबाईलची खात्री करुन श्री.डॉ. बसवराज शिवपुजे सो उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर व पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे एकुण २३ मोबाईल फोन एकुण किंमत २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमालाचा शोध घेवून मुळ मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, पोसई खोंडे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोकॉ/प्रमोद ढाकणे, पोकॉ/ सतीश कुऱ्हाडे, पोकॉ/नदीम शेख, पोकॉ सचिन ताजणे ,पोकॉ/अंकुश भोसले, पोकॉ/सय्यद तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे.
सदर नागरिकांनी मोबाईल परत मिळाल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला व पोलिसांचे आभार मानले.