कै. मोहनलाल गिरीधरलाल चोपडा यांच्या स्मरणार्थ श्री. क्षेत्र बालाजी ट्रस्ट देडगाव या देवस्थानाला दिली रुग्णवाहिका भेट.

कै. मोहनलाल गिरीधरलाल चोपडा यांच्या स्मरणार्थ श्री. क्षेत्र बालाजी ट्रस्ट देडगाव या देवस्थानाला दिली रुग्णवाहिका भेट.

बालाजी देडगाव (प्रतिनिधी इनुस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री क्षेत्र बालाजी मंदिर ट्रस्ट या देवस्थानास या कै. मोहनलाल गिरधरलाल चोपडा साहेब यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका भेट दिली.

       सामजिक कार्याचे भान डोळ्यासमोर ठेवून गावचे भूमिपुत्र म्हणुन या गावासाठी अगोदरही जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे संरक्षण भिंत ,संगणक व सुसज्ज बालमंच( स्टेज )व अहिल्याबाई होळकर शाळेसाठी संरक्षण भिंत, चार स्लापच्या वर्ग खोल्या तसेच गावामध्ये सौर ऊर्जेचे पथदिवे अशा अनेक ६० ते ७० लाखापर्यंत सुविधा चोपडा साहेब यांनी गावासाठी दिल्या. या दानशूर व्यक्तीच्या कुटुंबाचे देडगाव परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

           या उद्दात दिलेल्या दानाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुणे येथे . साहेबाचे भाऊ बबन काका ,काकू

मुलगा संजय मोहनलाल चोपडा,

सून माया संजय चोपडा,

पत्नी प्रेमाताई मोहनलाल चोपडा

नातवंड अक्षय संजय चोपडा, अनिकेत संजय चोपडा यांचा सन्मान करण्यात आला. व तेथे रुग्णवाहिकेची पूजा करण्यात आली.

        व दुसऱ्या दिवशी बालाजी मंदिर येथे हभप सुखदेव महाराज यांचे हस्ते विधिवत पूजा करण्यात आली .यावेळी सरपंच,उपसरपंच ,सदस्य ,चेअरमन , व्हा.चेअरमन, संचालक, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, विश्वस्त विविध संघटनेचे पदाधिकारी व पंचायत समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी रुग्णवाहिका बद्दल महिती दिली. की, ही सुविधा सर्व जाती धर्माचे लोकासाठी आहे. दुसऱ्या गाडीच्या तुलनेत कमी दरात गाडी दिली जाईल. या मुळे सर्व सामन्याचा , गरिबाचा मोठा फायदा होईल. व आपल्या या रुग्णवाहिके साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. व चोपडा कुटुंबाचे आभार मानले.