बालाजी देडगाव देवीवस्ती येथे रेणुका मातेचा नवरात्र उत्सव सोहळ्याला सुरुवात.

बालाजी देडगाव देवीवस्ती येथे रेणुका मातेचा नवरात्र उत्सव सोहळ्याला सुरुवात.

बालाजी देडगाव :- प्रतिनिधी युनूस पठाण

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवी वस्ती येथे ह भ प सुखदेव महाराज मुंगसे पुजारी जगन्नाथ शेटे व ह भ प रामायणाचार्य पाटेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री रेणुका मातेचा नवरात्री उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन याही वर्षी करण्यात आले आहे.

         यानिमित्ताने दिनांक 03 ऑक्टोंबर रोजी श्री मोहटादेवी या ठिकाणाहून महाज्योती चे आयोजन करण्यात आले आहे . त्यानंतर घटस्थापना सोहळा आयोजित केलेला आहे व दररोज सायंकाळी 4 ते 5 या सुमारास ह भ प रामायणाचार्य पाटेकर महाराज श्री .क्षेत्र गेवराई यांची मधुर वाणीतून देवी कथा होणार आहे.

       दररोज सकाळ व संध्याकाळ भाविकासाठी अन्नदात्या च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

      देवी वस्ती येथे रेणुका मातेचे अतिशय पुरातन मंदिर असून तेजस्विनी स्वरूपाची जुन्या काळातील मूर्ती आहे. या कालखंडातील मंदिर असून प्राचीन कालीन इतिहास इथे सांगितला जातो. या देवस्थानला नवरात्र निमित्त महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी येत असतात. ही रेणुका माता नवसाला पावणारी आहे अशी आख्यायिका आहे तर भक्तांची मनोकामना पुरी करते व अनेक भक्तांच्या नवसाला ही देवी पावते पूर्ण झालेला नवस फेडण्यासाठी व मनोभावे पूजा करण्यासाठी नऊ दिवस भक्ताची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. तर परिसरातील शालेय सहली या ठिकाणी भेट देत असतात. विविध कार्यक्रमाने नवरात्रीचा नवरात्र उत्सव सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न होतो आहे.

       या ठिकाणी कदम, गटकळ,वांढेकर, मुंगसे, कुटे , कोकरे आदि परिवार व जय भवानी युवा ग्रुप हा सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अनमोल कष्ट घेत आहे.