बोरीचं झाड म्हणजे अस्सल भारतीय झाड :- मेजर शिवाजीराव पठाडे
*बोरीचे झाडं म्हणजे अस्सल भारतीय झाडं
बालाजी देडगाव :- (प्रतिनिधी युनूस पठाण )या झाडाची चुकून एक मुळी जरी वावरात राहीली तरी तिथे च रोप तयार होते.
बोर हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटनार नाही असा एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही. हा शब्द ऐकल्यावर आपले मण भूतकाळात जाते
कारण काही वर्षापुर्वी सगळीकडे बोरीची झाडे उपलब्ध होती.
आमच्या लहानपणी आम्ही कायम बोराच्या झाडाकडे जात असत शाळेत जात असताना रस्त्यात बोरीचे झाडे आसायची आम्ही घरून लवकर निघून बोर गोळा करून खिसे भरायचो आणि खात खात शाळेत पोहचायचो परंतू
सन 1990 नंतरच्या काळात आधुनिक शेतीच्या नावाखाली या झाडांना मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आले
जमिनी बागायत करताना ही झाडे अडथळा ठरल्यामुळे ती तोडावी लागली. आर्थिक फायदा लक्षात घेता न आल्यामुळे ही झाडे तोडण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल होता व आजही आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोड झाली की, घरी बोरे खाण्यासाठी एकही झाड शेतकऱ्यांनी ठेवले नाही. त्यामुळे निसर्गाची एक परिसंस्था उद्ध्वस्त झालेली आहे.
आधुनिक काळामध्ये गावरान व देशी बोरीचे झाडें नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. आधुनिक जातींची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु, आपल्या आरोग्यासाठी, निसर्गासाठी, जमिनीमध्ये भूजल वाढविण्यासाठी, या झाडांचे जतन, संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. ही झाडे लावण्याची व त्यांना पाणी देण्याची, त्यांना रक्षण देण्याची काहीही गरज नाही. कारण ही झाडे सगळीकडे आपोआप उगवत असतात. त्यांना काटे असल्यामुळे त्यांचे रक्षण होते. जमिनीतील खोलवरील पाणी घेण्याची ताकद असल्यामुळे याला पाणी देण्याची गरज नसते. फक्त या झाडाची तोड थांबली पाहिजे. तोड थांबली की, ही झाडे आपोआप वाढणार आहेत. बालाजी फाउंडेशनने डोंगरावर अशी अनेक झाडे राखली आहेत, ती आता वेगाने वाढत आहेत. सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की, त्यांनी आपल्या शेतात एक तरी गावरान बोरीचे झाड ठेवा. आपल्या शेतातील अनेक अडचणी हे झाड कमी करेल.
आजही अनेक जलतज्ज्ञ यांनी हे सिद्ध केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव देखील असाच आहे की, बोरीच्या झाडापाशी जमिनीत पाणी असते. यामुळे आपण जर आपल्या शेतात बोरीची झाडेलावली तर जमिनीतील पाणी साठा वाढून आपण पाण्याची समस्या कमी करू शकतो.
शब्दलेखन बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर शिवाजीराव पठाडे.