स्थानिकांच्या पाठपुराव्याला यश,देहू येलवाडी रस्त्यावरील खड्डे अखेर बुजवले

स्थानिकांच्या पाठपुराव्याला यश,देहू येलवाडी रस्त्यावरील खड्डे अखेर बुजवले

प्रतिनिधी-देहू येलवाडी ला जोडल्या जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्डे प्रशासना मार्फत अखेर बुजवण्यात आले.ऐन पावसाळ्यात पडलेल्या या खड्यामुळे वाहतूक कोंडी चा प्रश्न निर्माण झाला होता.यामध्ये सविस्तर वृत्तांत असा की सदर रस्ता हा पुढे चाकण- तळेगाव महामार्ग NH 548 ला जोडला जातो.या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर एम आय डी सी ची वाहतूक होत असते त्यामुळे हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला होता व त्या रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडले होते. तसेच अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती ही झाली नसल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ट्राफिक कोंडी देखील होत होती.व या रस्त्यावर वरचे वर छोटे मोठे अपघात ही होत होते.येलवाडी गावाला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे स्थानिकांना या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत होता.या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी येलवाडी गावचे माजी सरपंच नितीन गाडे यांनी प्रशासनाला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा ही दिला होता. परंतु या पूर्वीच प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत.याबद्दल नितीन गाडे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत व यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी व अपघात टळण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.