मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप : आरोग्य शिबिराचे आयोजन.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुलींना सायकल वाटप : आरोग्य शिबिराचे आयोजन.
नागपूर प्रतिनिधी_प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.
पायल पल्लवी गार्डन, न्यू मनीष नगर, नागपूर येथे आज एक सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून विविध उपक्रमांचे उद्घाटन केले.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे आगमन सकाळी ११:१५ वाजता झाले. त्यांनी गार्डन परिसरात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर त्यांनी आरोग्य तपासणी शिबिराची पाहणी केली, ज्यात ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
स्वागत समारंभ
मुख्यमंत्र्यांचे स्वागत RBL बँके व भाजप दक्षिण-पश्चिम विभागा च्या संयुक्त कार्यक्रम, पायल पल्लवी गार्डन व अनुबंध बहुद्देशीय संस्था न्यू मनीष नगर यांच्या अथक प्रयत्नाने पार पडला. RBL बँकेच्या CSR उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि आरोग्य तपासणी सुविधा पुरविणे हा होता.
###








