रेशन कार्ड मधील नावे पुर्ण नसल्याने आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड पासुन नागरिक वंचित.
घोडेगाव वार्ताहर
रेशन कार्ड मधील नावे पुर्ण नसल्याने आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड पासुन नागरिक वंचित.
पुरवठा विभागाचा प्रताप ,रेशन दुकानदाराने जबाबदारी झटकली.
केंद्र शासनाने गरीब नागरिकांच्या आरोग्यासाठी आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड योजना आणली त्यात नागरिकांना पाच लाख रुपया पर्यंत उपचार मोफत मिळणार असल्याची घोषणा शासनाने केली.
मागील दीड वर्षांमध्ये गावोगावी रेशन दुकानदारांनी प्रत्येक रेशनकार्ड धारक यांचे कडून कार्यावर ज्यांची नावं आहेत अशा सगळ्यांची माहिती जमा केली. त्यात आधार कार्ड, पॅनकार्ड,सारखे पुरावे घेतले गेले हे सर्व त्या त्या तालुक्यातील पुरवठा विभागात जमा केले . परंतु संगणकावर माहिती अपडेट काम करणाऱ्यांनी हि माहिती बिनचुक भरली नाही. अनेकांचे नावात बदल झाले. काहींचे नाव पुर्ण नाही. पत्ते चुकले. पिनकोड चुकले. त्याचा परिणाम रेशन कार्डवर नाव पत्ता पुर्ण असुनही. संगणकावर उपलब्ध नसल्याने आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड काढण्यासाठी अडचणी येत आहे. संगणकावर संपूर्ण माहिती अपडेट नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आयुष्यमान भारत कार्ड काढून देणारे केंद्र चालक अन् नागरिकांमध्ये हमारी तुम्ही होऊ लागली आहे.
नेवासा तालुक्यातील पुरवठा विभागाने सर्व रेशन कार्डची माहिती तातडीने बिनचुक भरुन द्यावी जेणेकरून नागरिकांना अडचण येणार नाही अशी मागणी घोडेगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे.