लबाड व कामचोर अभियंते व ठेकेदार यांच्यामुळे नेवासा तालुक्यातील जलजीवन योजनेचे अनेक कामे रखडले.

लबाड व कामचोर अभियंते व ठेकेदार यांच्यामुळे नेवासा तालुक्यातील जलजीवन योजनेचे अनेक कामे रखडले.

नेवासा प्रतिनिधी//नेवासा तालुक्यातील जल जीवन योजनेचे अनेक कामे अपूर्ण स्वरूपात व निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे सध्या चर्चेत आहेत.अतिशय धुर्त व लबाड ठेकेदारांमुळे  योजनेला जणू साडेसाती लागलेली आहे.

     यामध्ये जलजीवन योजनेचे मुख्य अभियंते व  नेवासा तालुक्याचे मुख्य अभियंते  या योजनेतील काम पाहणारा ठेकेदार यांनी बहुतेक कामे अधोरे ठेवलेले असून शासकीय योजनेचा माल बेवारस पडलेला आहे.

      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल मिशन 2024  योजनेसाठी या योजनेची पायाभरणी व अंमलबजावणी केलेली होती. मात्र पंतप्रधानांच्या स्वप्नावर अशा धुर्त ठेकेदारांनी विरजण टाकलेले आहे.

      आर्थिक लोभपाई  निकृष्ट दर्जाच्या ,अकुशल ठेकेदारांना काम दिल्यामुळे सदर योजनेला जणू साडेसाती लागलेली आहे.

        नेवासा तालुक्यातील खेडले परमानंद शिरेगाव ,येथील योजने संदर्भात असाच काही प्रकार घडून आलेला आहे.

      सदरच्या कामाची चौकशी होऊन जे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे त्यावर ताबडतोब कारवाई करून पुढील काम लवकरात लवकर चालू करावे अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.

          या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या टाकीचे काम निकृष्ट व अधुर असल्यामुळे योजना पूर्ण होते की नाही याबद्दल  ग्रामस्थांना शंका आहे .योजनेचे अभियंते व ठेकेदार पत्रकार व सर्वसामान्य ग्रामस्थांचे साधे फोनही रिसिव्ह करत नाही.

        वाड्या वस्त्यांवर जी पाईपलाईन अंथरलेली आहे ती बेवारस अधुर्या स्वरूपात व ठिकठिकाणी गायब झालेली दिसते.याची तातडीने चौकशी करण्यात यावी व जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधित ठेकेदार अभियंते यांना लवकरात लवकर कारणे दाखवा नोटीस काढावी अशी विनंती खेडले परमानंद शिरेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे .

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.