बहुजन महिला यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेला बहुजन महिला ग्रामीण विकास संघ यांच्या कार्याला उजाळा देणारा भव्य उद्घाटन सोहळा आणि जागतिक महिला दिन हा दिवस 8 मार्च दोन हजार बावीस रोजी स्नेहसदन चर्च राहुरी या ठिकाणी मोठ्या थाटात पार पडला
आज दिनांक 8 मार्च 2022 रोजी बहुजन महिला ग्रामीण विकास संघ याचे संस्थापक अध्यक्ष शालिनीताई लाला पंडित आधारस्तंभ मार्गदर्शक श्री लाला रतन पंडित यांच्या संस्थेचे उद्घाटन सोहळा व जागतिक महिला दिन स्नेहसदन चर्च राहुरी या ठिकाणी आदरणीय व माननीय स्नेहसदन चर्चेचे अध्यक्ष फादर अनिल चक्रनारायण व फादर मायकल राजा तसेच नगरसेवक सूर्यकांत भुजाडी राहुरी समन्यक सुनंदाताई दहातोंडे तसेच जीजस कॉल एस्टर ग्रुप रोहिणीताई हिवाळे व रतन पाळंदे सर या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये अत्यंत थाटात पार पडला सदर कार्यक्रमात फादर अनिल चक्रनारायण यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये महिलांचे समाजामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे त्यांच्या सर्वांगिन विकासाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे त्यांना शिक्षण दिले पाहिजे असे सांगितले तसेच बहुजन महिलांच्या विकासासाठी ते सदैव संस्थेच्या कार्यात उभे राहतील असे प्रतिपादन केले त्यानंतर सुनंदाताई दहातोंडे यांनी बहुजन महिला ग्रामीण विकास संघाच्या अध्यक्ष व संस्थापक शालिनीताई लाला पंडित व संस्थेचे मार्गदर्शक आधारस्तंभ लाला रतन पंडित साहेब यांनी सर्वसामान्य गोरगरीब महिलांच्या विकासासाठी केलेल्या सामाजिक धार्मिक व राजकीय कार्यांना उजळा दिला व यापुढेही संस्थेच्या कार्यामध्ये सदैव तत्पर राहतील असे प्रतिपादन बहुजन महिला ग्रामीण विकास संघाचे अध्यक्ष विनोद कुमार लाला पंडित संस्थेचे उपाध्यक्ष एडवोकेट मनीषा लाला पंडित संघ सदस्य शोभा विनोद जगताप सचिव शितल विनोद कुमार पंडित व इतर संस्थेचे पदाधिकारी यांना केले तसेच रतन पाळंदे सर यांनी आदरणीय व परम पूज्य मदर तेरेसा यांनी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती दिली व ते देखील बहुजन महिला ग्रामीण विकास संघाच्या कार्यात सदैव तत्पर असतील असे प्रतिपादन केले तसेच एडवोकेट मनीषा लाला पंडित यांनी बहुजन महिला ग्रामीण विकास संघामार्फत महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना समाजात मोलाचे स्थान मिळवून देण्याचे सांगितले तसेच महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढून त्यांना न्याय देण्याचे काम करू तसेच त्यांच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेऊ असे प्रतिपादन केले तसेच बहुजन महिला ग्रामीण विकास संघाच्या संस्थापक अध्यक्ष शालिनीताई लाला पंडित( मातोश्री ) व संस्थेचे मार्गदर्शक व आधारस्तंभ श्री लाला रतन पंडित( वडील ) यांनी समाजातील केलेल्या धार्मिक सामाजिक व राजकीय कार्यांना उजाळा देऊन यापुढेही संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडू देणार नाही असे सांगितले तसेच सदर कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब सगळंगीळे यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व महिलांना मार्गदर्शन केले.