खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शिर्डीत होणार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शिर्डीत होणार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नातून शिर्डीत होणार परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा

प्रतिनिधी//प्रसाद घोगरे//9370328944.

श्री शिवाय नमस्तुभ्यं...

शिर्डीसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक शुभ आणि ऐतिहासिक बातमी आहे. शिर्डीत प्रथमच परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची शिवपुराण कथा होणार असून, यामागे प्रमुख पुढाकार डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी आणि अहिल्यानगर परिसरातील माता-भगिनी, शिवभक्त आणि स्थानिक नागरिकांकडून सातत्याने विनंती केली जात होती की, कुबेरेश्वर धामप्रमाणे शिर्डीतही शिवपुराण कथेचे आयोजन व्हावे.

ही भावना हृदयात साठवून डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन, मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाम येथे जाऊन परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा महाराजांची प्रत्यक्ष भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि शिर्डीत कथा महोत्सवासाठी त्यांची संमती मिळवली.

शिवपुराण कथा महोत्सव

दि. १२ ते १६ ऑक्टोबर २०२५
शिर्डी, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र


या आयोजनामुळे शिर्डीमध्ये अध्यात्म, संस्कृती, श्रद्धा आणि भक्तीचा महासंगम होणार आहे. लाखो भाविक शिर्डीकडे येणार असून, शिवमंत्रांनी साईभूमी निनादेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण योजनेसाठी डॉ. सुजय विखे पाटील यांचे नेतृत्व, आणि स्थानिक जनतेप्रती असलेली आस्था हे महत्त्वाचे ठरले आहेत. त्यांनी केवळ राजकीय जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक शिवभक्त आणि जनतेचे प्रतिनिधी म्हणून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.


सर्व शिवभक्त, माता-भगिनींनी व आपल्या कुटुंबासह या पवित्र शिवपुराण कथा महोत्सवात सहभागी व्हावे आणि या दिव्य संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.