महाराष्ट्रातील रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन.

महाराष्ट्रातील रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन.

महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि श्री. श्रीकांत शिंदे साहेब खासदार ठाणे यांना महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

           या मागणीमध्ये 2006 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास 28 हजार रोजगार सेवक अगदी तुटपुंज्या रकमेमध्ये काम करत आहे व शासनाच्या नियमानुसार अर्धवट स्वरूपात परंतु प्रत्यक्षात पूर्णवेळ काम करून घेतले जाते.

        महाराष्ट्र सोडता दुसऱ्या राज्यामध्ये रोजगार सेवकांना प्रतिमाह निश्चित महिना ठरवून दिला जातो .महाराष्ट्र मध्ये तसा नियम लागू करावा व सेवेत कायम सामावून घेण्यात यावे अशा विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

       मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी तातडीने निवेदनावर कार्यवाही करुन प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत.प्रतिमाह फिक्स मानधन आणि सेवेत सामावून घेण्यासाठी शब्द दिला आहे.तसे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. यावर महाराष्ट्र शासन काय निर्णय घेईल याकडे महाराष्ट्रातील जवळपास 28 हजार रोजगार सेवकांचे लक्ष लागले आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय द्या अशी मागणी होत आहे.

        याप्रसंगी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख श्री लांडगे साहेब,कल्यान चे नगरसेवक श्री .नविन गवळी साहेब , व श्री. संदिप माने यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

         तर आज महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना एन जी पी ५१०२ चे संस्थापक उपाध्यक्ष श्री सोन्याबापू शेवकर साहेब, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री दत्तात्रेय सुतार साहेब व राज्य प्रसिध्दी प्रमुख सोनी शर्मा यावेळी उपस्थित हो

ते.