संत फ्रान्सिस झेवियर व आरोग्यदायी मातेचा ४८ वा यात्रा महोत्सव भक्तीभावाने आनंदाने साजरा.
श्रीरामपूर ( टिळकनगर ) येथे दि. १० डिसेंबर २०२३ संत फ्रान्सिस झेवियर व आरोग्यदायी माता यात्रा महोत्सव, टिळकनगर. ता. राहाता, जि. अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती भाविकांचे श्रद्धेचे व प्रेषित कार्याचे प्रेरणास्थान आणि टिळकनगर धर्मग्रामाचा आश्रयदाता संत फ्रान्सिस झेवियर या महान संताचा सन्मानोत्सव यात्रा महोत्सव सोहळा अनेक धर्मगुरू व धर्मभगिनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टिळकनगर या पावनभूमीत संपन्न होतांना सकाळी ९:३० वाजता सालाबादप्रमाणे श्री. खरात साहेब यांच्या कार वरती पवित्र मरिया माऊलीची प्रतीमा बसवून मिरवणूक दत्तनगर चर्च मधून निघाली आणि सकाळी १०:३० वाजता टिळकनगर चर्च मध्ये पोहचली. मा. महागुरुस्वामी बिशप लुड्स डॅनियल, कॅथोलिक नाशिक धर्मप्रांत यांच्या आशिर्वादाने व या सणाच्या पवित्र मिस्साचे प्रमुख याजक व प्रवचनकार रेव्ह. फा. भाऊसाहेब संसारे एस. जे. ( रेक्टर, पेपल सेमिनरी,पुणे.) यांच्या प्रमुख याजक म्हणून सकाळी ११:०० वाजता जिल्ह्यातील विविध धर्मग्रामातील धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्या उपस्थितीत मिस्सा अर्पण करण्यासाठी सुरुवात झाली. या आध्यात्मिक सोहळ्यासाठी आसपासच्या धर्मग्रामातील सर्व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. आपला आध्यात्मिक प्रवास कसा असावा, सुखाची व्याख्या करण्यासाठी दु:ख माहीत असणे आवश्यक आहे. पवित्र मरियाने देवाचे अखिल मानवाबद्दलचे धोरण देवदूताशी संवाद करुन समजून घेउन देवाचा शब्द प्रमाण मानला " मी प्रभूची दासी आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्याठायी होवो " आपल्याही प्रार्थनेत देवा बरोबर संवाद असावा मात्र तो एकेरी एकमार्गी नसावा, आपणही एकमेकांशी संवादाकरवी समजून घ्यावे. संत फ्रान्सिस झेवियर बाबत माहिती सांगतांना, आज्ञाधारकपणा कसा असावा, मिशन कार्यासाठी भारतात येण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता संत फ्रान्सिस झेवियर तयार झाले. सन १५४२ ला ते भारतात येऊन १० वर्षे मिशनरी कार्य केले. आज या निमित्ताने मुलांमुलींना आई वडिलांची, वडिलधाऱ्याची तसेच शिक्षकांची आज्ञा पाळली पाहीजे. त्याच प्रमाणे देवाने दिलेल्या १० आज्ञा पाळा देवाचा गौरव करण्यात कठीण काय? रेव्ह फा संसारे यांनी येशू व मरिया तसेच अनेक संतांची उदाहरण दिले. देवाचे अस्तित्व ओळखणे त्याची जाणीव असणे, देव एकमेकात शोधत नाही पहात नाही तो पर्यंत आपण शुभवर्तमान म्हणजे काय? दुसऱ्यांशी चांगली वार्ता संभाषण करु शकतो नाही. अन्यथा आपण दुसऱ्यातील दोष, उणिवा,चुका शोधत असतो अफवा पसरवून देवा विरुद्ध पाप करतो, कारण जर स्वतः मध्ये देव नाही तर दुसऱ्या मध्ये कसा सापडेल.चांगले बोलण्यासाठी काही विकत घ्यावे लागत नाही तर ते अंत:करणातून जोपासले जाते चांगल शोधणे तुमच्या मध्ये असाव. एक नावाजलेला पत्रकार आपल्या मित्रांबरोबर संवादांत म्हणतो की, खर वास्तविक त्यांनी याठिकाणी येशु ख्रिस्ताचा उल्लेख केला नाही. "It is not enough to be a objective person, but you need to take a side of people specially the vulnerable, the poor and the needy." वस्तुनिष्ठ व नियमानुसार वागणारी व्यक्ती असणे पुरेसे नाही, तर तुम्हाला लोकांची बाजू घेणे आवश्यक आहे, विशेषत: असुरक्षित, गरीब आणि गरजूंची. येशूने गरीब, गरजू, अंध अपंग यांसारख्या अनेक लोकांसाठी कार्य केले, देवाची दया, क्षमा,शांती त्यांचे पर्यंत नेली आणि संत फ्रान्सिस व सर्व संतांनी हाच आदर्श जनतेला दिला. " मानवाने सर्व जग कमवल पण आपला आत्मा गमवला तर काय लाभ " आपलाआत्म्य विकास होण्यासाठी मिशन-यांनी चर्च उभारली शैक्षणिक विकासा करीता शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी दवाखाने, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशिक्षण मिळावे म्हणून टेक्निकल आय टी आय संस्था काढल्या याप्रमाणे सर्वांगीण विकासासाठी नियोजन केले. याबरोबरच रेव्ह फा संसारे यांनी सर्वांगिण विकासाबरोबरच कुटुंबामधुनच संविधान आपण जपल पाहिजे कारण ह्या भारतीय संविधानानेच सर्व धर्मांना एकत्रित ठेवले आहे. सर्व धर्माचे अधिकार अबाधित अधोरेखित केले आहे. सर्वांना समानतेची वागणूक या संविधानाच्या मुळे मिळत आहे. संविधान आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनवून समानता बंधुता जपले पाहिजे. संविधानामध्ये ज्या गोष्टी, घटना आहेत त्या नविन करारावर आधारित असुन बौध्द धर्माची काही तत्वे वापरली आहेत. सर्व विश्वांना एकत्र ठेवण्यासाठी खुप मोठी आध्यात्मिक सामुग्री आहे. एकमेकांवरील विश्वास व श्रध्दा भक्कम असावा, उदाहरण देतांना ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर रोजी मा.सुप्रीम कोर्टातील प्रांगणातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यावेळी केलेल्या भाषणात मा. सुप्रीम कोर्टाच्या मा. न्यायाधिशांनी बोललेल्या शेवटच्या ओळी म्हणजे "तुम्हारा विश्वास ही हमारा श्रध्दा स्थान है" याप्रमाणे एकमेकांवर व देवावर विश्वास ठेवा, पतीपत्नीने एकमेकांवर,मुलांनी आई वडिलांचे वर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून त्यांनी मरिया माता व संत फ्रान्सिस झेवियर कडे प्रार्थना करुया की, आमचा विश्वास वाढावा व आपल्या मधील देव शोधावा व त्याची स्तुती आराधना करायला शिकावे. येणाऱ्या आगमन काळाची तयारी करण्यासाठी आपणा मध्ये परमेश्वराची दया, प्रेम,शांती आणि क्षमा असावी तरच आपण येणारा नाताळ चांगल्या प्रकारे साजरा करु शकतो. मुख्य याजक रेव्ह फा संसारे यांनी विशेष शैलीतून भाविकांना आध्यात्मिक ज्ञान व सामाजिक जाणिवेतून ज्ञान दिले. मिस्सा अर्पण करून ख्रिस्त प्रसाद भाविकांना देण्यात आला. सर्व धार्मिक विधी शांततेत शिस्तबद्ध झाला. टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फा मायकल यांनी रेव्ह फा भाऊसाहेब संसारे यांचा शाॅल व पुष्प गुच्छ देवून सन्मानित केले तर उपस्थित सर्व धर्मगुरू व धर्म भगिनी यांचेही शाॅल व पुष्प गुच्छ देवून सत्कार केला व आभार मानले. श्री. खरात पतिपत्नी यांचे शाॅल व पुष्प गुच्छ देवून आभार मानले.दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व रांजणखोल ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचेही विशेष सहकार्य केल्याबद्ल आभार मानले,धर्मग्रामातील पाळकिय मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, जेष्ठ नागरिक मंडळ,भजनी मंडळ,संडे स्कूल बाल मंडळ,मुलगामी ख्रिस्ती समुह आणि धर्मग्रामातील सर्व भाविक, ग्रामस्थ यांचे आभार मानले. विशेष सहकार्य केल्या बद्दल कॅथोलिक मराठी शाळा, टिळकनगर येथील सर्व शिक्षिका व मुख्याध्यापक सुनिल उबाळे सर यांचे तसेच या शाळेतील माजी मुख्याध्यापकांचेही शाॅल व पुष्प गुच्छ देवून गौरव करण्यात आला. भाविक एकमेकांना शुभेच्छा देत प्रिती भोजनाचा आस्वाद घेतला. या वर्षाच्या यात्रा महोत्सवाचे नियोजन रेव्ह फा मायकल, रेव्ह फा जाधव व रेव्ह फा संजय तसेच आनंद विहार सिस्टर्स आणि विविध मंडळांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचे दिसून आले.. ... ... Delhi91. BPS live News NETWORK Government of Delhi.... Reporter.. Prakash Nikale.. श्रीरामपूर ( टिळकनगर ) येथे दि. १० डिसेंबर २०२३ संत फ्रान्सिस झेवियर व आरोग्यदायी माता यात्रा महोत्सव, टिळकनगर. ता. राहाता, जि. अहमदनगर जिल्ह्यातील ख्रिस्ती भाविकांचे श्रद्धेचे व प्रेषित कार्याचे प्रेरणास्थान आणि टिळकनगर धर्मग्रामाचा आश्रयदाता संत फ्रान्सिस झेवियर या महान संताचा सन्मानोत्सव यात्रा महोत्सव सोहळा अनेक धर्मगुरू व धर्मभगिनी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या टिळकनगर या पावनभूमीत संपन्न होतांना सकाळी ९:३० वाजता सालाबादप्रमाणे श्री. खरात साहेब यांच्या कार वरती पवित्र मरिया माऊलीची प्रतीमा बसवून मिरवणूक दत्तनगर चर्च मधून निघाली आणि सकाळी १०:३० वाजता टिळकनगर चर्च मध्ये पोहचली. मा. महागुरुस्वामी बिशप लुड्स डॅनियल, कॅथोलिक नाशिक धर्मप्रांत यांच्या आशिर्वादाने व या सणाच्या पवित्र मिस्साचे प्रमुख याजक व प्रवचनकार रेव्ह. फा. भाऊसाहेब संसारे एस. जे. ( रेक्टर, पेपल सेमिनरी,पुणे.) यांच्या प्रमुख याजक म्हणून सकाळी ११:०० वाजता जिल्ह्यातील विविध धर्मग्रामातील धर्मगुरू, धर्मभगिनी यांच्या उपस्थितीत मिस्सा अर्पण करण्यासाठी सुरुवात झाली. या आध्यात्मिक सोहळ्यासाठी आसपासच्या धर्मग्रामातील सर्व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते. आपला आध्यात्मिक प्रवास कसा असावा, सुखाची व्याख्या करण्यासाठी दु:ख माहीत असणे आवश्यक आहे. पवित्र मरियाने देवाचे अखिल मानवाबद्दलचे धोरण देवदूताशी संवाद करुन समजून घेउन देवाचा शब्द प्रमाण मानला " मी प्रभूची दासी आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्याठायी होवो " आपल्याही प्रार्थनेत देवा बरोबर संवाद असावा मात्र तो एकेरी एकमार्गी नसावा, आपणही एकमेकांशी संवादाकरवी समजून घ्यावे. संत फ्रान्सिस झेवियर बाबत माहिती सांगतांना, आज्ञाधारकपणा कसा असावा, मिशन कार्यासाठी भारतात येण्यासाठी क्षणाचाही विलंब न करता संत फ्रान्सिस झेवियर तयार झाले. सन १५४२ ला ते भारतात येऊन १० वर्षे मिशनरी कार्य केले. आज या निमित्ताने मुलांमुलींना आई वडिलांची, वडिलधाऱ्याची तसेच शिक्षकांची आज्ञा पाळली पाहीजे. त्याच प्रमाणे देवाने दिलेल्या १० आज्ञा पाळा देवाचा गौरव करण्यात कठीण काय? रेव्ह फा संसारे यांनी येशू व मरिया तसेच अनेक संतांची उदाहरण दिले. देवाचे अस्तित्व ओळखणे त्याची जाणीव असणे, देव एकमेकात शोधत नाही पहात नाही तो पर्यंत आपण शुभवर्तमान म्हणजे काय? दुसऱ्यांशी चांगली वार्ता संभाषण करु शकतो नाही. अन्यथा आपण दुसऱ्यातील दोष, उणिवा,चुका शोधत असतो अफवा पसरवून देवा विरुद्ध पाप करतो, कारण जर स्वतः मध्ये देव नाही तर दुसऱ्या मध्ये कसा सापडेल.चांगले बोलण्यासाठी काही विकत घ्यावे लागत नाही तर ते अंत:करणातून जोपासले जाते चांगल शोधणे तुमच्या मध्ये असाव. एक नावाजलेला पत्रकार आपल्या मित्रांबरोबर संवादांत म्हणतो की, खर वास्तविक त्यांनी याठिकाणी येशु ख्रिस्ताचा उल्लेख केला नाही. "It is not enough to be a objective person, but you need to take a side of people specially the vulnerable, the poor and the needy." वस्तुनिष्ठ व नियमानुसार वागणारी व्यक्ती असणे पुरेसे नाही, तर तुम्हाला लोकांची बाजू घेणे आवश्यक आहे, विशेषत: असुरक्षित, गरीब आणि गरजूंची. येशूने गरीब, गरजू, अंध अपंग यांसारख्या अनेक लोकांसाठी कार्य केले, देवाची दया, क्षमा,शांती त्यांचे पर्यंत नेली आणि संत फ्रान्सिस व सर्व संतांनी हाच आदर्श जनतेला दिला. " मानवाने सर्व जग कमवल पण आपला आत्मा गमवला तर काय लाभ " आपलाआत्म्य विकास होण्यासाठी मिशन-यांनी चर्च उभारली शैक्षणिक विकासा करीता शैक्षणिक संस्था स्थापन केल्या, स्वास्थ्य चांगले रहावे यासाठी दवाखाने, रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रशिक्षण मिळावे म्हणून टेक्निकल आय टी आय संस्था काढल्या याप्रमाणे सर्वांगीण विकासासाठी नियोजन केले. याबरोबरच रेव्ह फा संसारे यांनी सर्वांगिण विकासाबरोबरच कुटुंबामधुनच संविधान आपण जपल पाहिजे कारण ह्या भारतीय संविधानानेच सर्व धर्मांना एकत्रित ठेवले आहे. सर्व धर्माचे अधिकार अबाधित अधोरेखित केले आहे. सर्वांना समानतेची वागणूक या संविधानाच्या मुळे मिळत आहे. संविधान आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक बनवून समानता बंधुता जपले पाहिजे. संविधानामध्ये ज्या गोष्टी, घटना आहेत त्या नविन करारावर आधारित असुन बौध्द धर्माची काही तत्वे वापरली आहेत. सर्व विश्वांना एकत्र ठेवण्यासाठी खुप मोठी आध्यात्मिक सामुग्री आहे. एकमेकांवरील विश्वास व श्रध्दा भक्कम असावा, उदाहरण देतांना ते म्हणाले की, २६ नोव्हेंबर रोजी मा.सुप्रीम कोर्टातील प्रांगणातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले त्यावेळी केलेल्या भाषणात मा. सुप्रीम कोर्टाच्या मा. न्यायाधिशांनी बोललेल्या शेवटच्या ओळी म्हणजे "तुम्हारा विश्वास ही हमारा श्रध्दा स्थान है" याप्रमाणे एकमेकांवर व देवावर विश्वास ठेवा, पतीपत्नीने एकमेकांवर,मुलांनी आई वडिलांचे वर विश्वास ठेवला पाहिजे. म्हणून त्यांनी मरिया माता व संत फ्रान्सिस झेवियर कडे प्रार्थना करुया की, आमचा विश्वास वाढावा व आपल्या मधील देव शोधावा व त्याची स्तुती आराधना करायला शिकावे. येणाऱ्या आगमन काळाची तयारी करण्यासाठी आपणा मध्ये परमेश्वराची दया, प्रेम,शांती आणि क्षमा असावी तरच आपण येणारा नाताळ चांगल्या प्रकारे साजरा करु शकतो. मुख्य याजक रेव्ह फा संसारे यांनी विशेष शैलीतून भाविकांना आध्यात्मिक ज्ञान व सामाजिक जाणिवेतून ज्ञान दिले. मिस्सा अर्पण करून ख्रिस्त प्रसाद भाविकांना देण्यात आला. सर्व धार्मिक विधी शांततेत शिस्तबद्ध झाला. टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह फा मायकल यांनी रेव्ह फा भाऊसाहेब संसारे यांचा शाॅल व पुष्प गुच्छ देवून सन्मानित केले तर उपस्थित सर्व धर्मगुरू व धर्म भगिनी यांचेही शाॅल व पुष्प गुच्छ देवून सत्कार केला व आभार मानले. श्री. खरात पतिपत्नी यांचे शाॅल व पुष्प गुच्छ देवून आभार मानले.दत्तनगर ग्रामपंचायत सरपंच,सदस्य व रांजणखोल ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांचेही विशेष सहकार्य केल्याबद्ल आभार मानले,धर्मग्रामातील पाळकिय मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, जेष्ठ नागरिक मंडळ,भजनी मंडळ,संडे स्कूल बाल मंडळ,मुलगामी ख्रिस्ती समुह आणि धर्मग्रामातील सर्व भाविक, ग्रामस्थ यांचे आभार मानले. विशेष सहकार्य केल्या बद्दल कॅथोलिक मराठी शाळा, टिळकनगर येथील सर्व शिक्षिका व मुख्याध्यापक सुनिल उबाळे सर यांचे तसेच या शाळेतील माजी मुख्याध्यापकांचेही शाॅल व पुष्प गुच्छ देवून गौरव करण्यात आला. भाविक एकमेकांना शुभेच्छा देत प्रिती भोजनाचा आस्वाद घेतला. या वर्षाच्या यात्रा महोत्सवाचे नियोजन रेव्ह फा मायकल, रेव्ह फा जाधव व रेव्ह फा संजय तसेच आनंद विहार सिस्टर्स आणि विविध मंडळांनी चांगल्या प्रकारे नियोजन केल्याचे दिसून आले.. ... ... Delhi91. BPS live News NETWORK Government of Delhi.... Reporter.. Prakash Nikale.