बालाजी देडगाव येथे राजा वीरभद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा कुकाणा रोड येथे मोठ्या उत्साहात होणार संपन्न.
बालाजी देडगाव. :- ( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे कुकाणा रोड परिसरात ह भ प शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान यांच्या शुभ आशीर्वादाने व ह भ प गाथामूर्ती सुखदेव महाराज मुंगसे यांच्या अधिपत्याखाली (पंडित वस्ती) जवळ राजा वीरभद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
रविवार दिनांक 10 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत मूर्तीची भव्य मिरवणूक गावामधून निघणार आहे. वाजत गाजत व फटाक्याच्या आतषबाजी मध्ये ही मिरवणूक पार पडणार असून ,या मिरवणुकीमध्ये सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. व महिलांनी ही डोक्यावरील कलश सजावट करून आणावे. ब्राह्मणाच्या वेदमंत्राच्या उच्चाराच्या साह्याने होमहवंनांचे ही आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्यांना या पूजेसाठी बसायचं असेल त्यांनी पूजेचे ताट व जोडी सहित उपस्थित राहायचे आहे.
सोमवार दिनांक 11 रोजी राजा वीरभद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलश रोहन महंत , स्वामी गोपाल गिरीजी महाराजांच्या शुभहस्ते होणार आहे. तदनंतर लगेचच महाआरतीची आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर लगेचच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बनसोडे परिवार व पंडित परिवार हे मोलाचे कष्ट व सहकार्य करत आहे. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे अशी भाविकांना विनंती करण्यात आली आहे.