मृदा व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या पी. ए वर गोळीबार.
प्रतिनिधी :-सोनई नेवासा
मंत्री गडाख यांचे पीए राहुल राजळे यांचेवर काही अज्ञात हल्लेखोरांनी लोहगाव येथे प्राणघातक हल्ला केला. या वेळी दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.
राहुल राजळे यांच्या वर पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे समजते. राहुल राजळे एका यात्रेतून घरी परतत असताना. लोहगाव परिसरातील त्यांच्या घराच्या आसपास दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. राजळे यांच्यावर पाच गोळ्या एकामागोमाग झाडल्याचे समजते. त्यापैकी त्यांना दोन गोळ्या लागल्या.
घटनेची माहिती कळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली व राहुल राजळे यांना अहमदनगर येथे उपचारासाठी तत्काळ हलवण्यात आले. रात्री उशीरा 12 च्या सुमारास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सदर गुन्हेगार हे सराईत असून परिसरातील असावे असा पोलिस यंत्रणेचा अंदाज आहे. हल्लेखोरांची कसून शोध मोहीम चालू आहे.
मंत्र्यांच्या पि .ए वर झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून राहुल राजळे हे गडाख परिवारा सोबत एक विश्वसनीय सदस्य म्हणून आहेत.