राज्यातील ४३३ आय टी आय मध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन - समाजामध्ये संविधाना बद्दल जनजागृती.
श्रीरामपूर -: आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी संविधान मंदिराचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीश धनकड यांच्या शुभहस्ते व राज्याचे मान्य मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत एलिफंस्टन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई येथे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले व त्याचबरोबर राज्यातील 433 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये याच वेळी एकाच दिवशी संविधान मंदिराचे उद्घाटन झाले. समाजामध्ये संविधाना बद्दल जनजागृती करण्यासाठी राज्यातील 433 आय टी आय पैकी श्रीरामपूर येथील शासकीय आय टी आय मध्ये संविधान मंदिर उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी माननीय आमदार श्री. लहुजी कानडे यांनी या संविधान मंदिराचे उद्घाटन केले तर याप्रसंगी श्रीरामपूर एमआयडीसी चे सहाय्यक श्री. सोनटक्के साहेब, एमआयडीसी मेंबर श्री. एस एंटरप्राईजेस चे मालक सुनील चंदन साहेब, ट्रस्ट वेल इंजिनिअरिंगचे शैलेश आंबेकर साहेब तसेच दत्तनगरचे महिला सरपंच सौ.सरीता कुंकलोळ व त्यांचे पती श्री प्रेमचंद कुंकलोळ आणि उपसरपंच सौ कुसुमबाई जगताप, सुरेश जगताप हे मान्यवर उपस्थित होते यावेळी वायरमन व फिटर व्यवसायाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षक , प्राध्यापक या क्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासकिय आय टी आय चे मा. प्राचार्य, श्री. पालवे साहेब, तसेच माननीय जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अहमदनगरचे माननीय श्री सुनील शिंदे साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. श्रीरामपूर आयटीआय मधील संविधान मंदिराचे उद्घाटन सोहळ्यासाठी सूत्रसंचालन व विशेष मेहनत, सर्व कार्यभार माननीय आ टी आय चे गट निदेशक श्री माळी सर यांनी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली तर यासाठी आयटीआय मधील निदेशक तसेच शिक्षकेतर कर्मचारी व सर्व स्टाफ यांनी सहकार्य करून हा संविधान मंदिर उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.