घोडेगाव येथे एकाच रात्री चार बंद घरासह भुमी अभिलेख कार्यालयात चोरी..

घोडेगाव येथे एकाच रात्री चार बंद घरासह भुमी अभिलेख कार्यालयात चोरी..

घोडेगाव येथे एकाच रात्री चार बंद घरासह भुमी अभिलेख कार्यालयात चोरी.. 

              नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे एकाच रात्री भुमी अभिलेख कार्यालय सह चार बंद घराची कुलपे तोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे. 

पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १४ सप्टेंबर  मध्य रात्री अनंत रामदास शेळके वय ३७ रा. परिट गल्ली घोडेगाव यांच्या बंद घराचे कुलुप तोडून कपटाची आतील सामानांची उचाकपाचक करत ४४,००० रुपयांच्या दागिने सह रोख रक्कम ८००० असा एकूण ५२००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिवाजी भाऊराव शेंडगे घोडेगाव हल्ली रा. मुंबई , पुढे बापुसाहेब कोटस्थाने रा. घोडेगाव तसेच भूमी अभिलेख कार्यालय मध्ये कार्यालयाचे देखील कुलुप तोडून आतील सामानांची उचाकपाचक केल्याचे समोर आले. शेवटी चोरट्यांनी आपला मोर्चा जुना शिंगवे रोडवरील सुनील एकनाथ कदम यांचे घराकडे वळवला त्यामध्ये त्यांची घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. अनंत रामदास शेळके रा. घोडेगाव परिट गल्ली यांचे फिर्यादी वरुन गुन्हा र. नं. ३८३/२०२४ बिएनएस चे कलम ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. हे. काॅ. दत्ता गावडे हे करत आहेत.