पत्रकारांच्या दक्षतेमुळे हरवलेली व्यक्ती तत्काळ सापडली. कुटुंबियांनी मानले पत्रकारांचे आभार.

पत्रकारांच्या दक्षतेमुळे हरवलेली व्यक्ती तत्काळ सापडली. कुटुंबियांनी मानले पत्रकारांचे आभार.

        बी पी एस न्यूज नेटवर्क व आम्ही नेवासकर न्यूज यांच्या बातमीमुळे हरवलेल्या गृहिणी अगदी सुखरूप सापडल्या.    

            सदर गृहिणी बेपत्ता असल्याचे कळताच पत्रकार संभाजी शिंदे यांनी सदर घटनेची दखल घेत, शिरेगाव येथील रमेश तुवर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ सर्व माहिती पुरवली व लगेच बातमी तयार होऊन ई पेपर च्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यात आली.

       बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आणि एक अज्ञात नंबर वरून फोन आला की सदरची व्यक्ती या ठिकाणी असून ती एकदम सुरक्षित आहे.

       घरच्या मंडळींचा जीव भांड्यात पडला,त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सदर व्यक्तीला अगदी सुखरूप आपल्या घरी घेऊन आले त्यानंतर त्यांनी पत्रकार संभाजी शिंदे यांच्याशी संपर्क साधून बी पी एस लाईव्ह न्यूज नेटवर्क आणि आम्ही नेवासकर न्यूज चे खूप खूप धन्यवाद मानले.

            या हरवलेल्या व्यक्तीची तक्रार देण्यासाठी घरातील मंडळी सोनई पोलीस स्टेशन येथे गेले होते परंतु पोलीस यंत्रणेने त्यांना सांगितले की थोडी सखोल माहिती घ्या कदाचित त्या येतील आणि नंतर नाही आल्या तर आपण तक्रार नोंदवू. परंतु बातमीने इतका परिणाम केला की या व्यक्ती तात्काळ सापडल्या.

          या शोध मोहिमेत बी .पी .एस लाईव्ह न्युज नेटवर्क चे जिल्हाध्यक्ष कृष्णा गायकवाड सर, सचिन पवार त्याचप्रमाणे आम्ही नेवासकर टीमचे सौरभ मुनोत व अभिषेक गाडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.