शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न ,विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारीक ज्ञानाचे धडे .

शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न ,विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारीक ज्ञानाचे धडे .

          आज राहुरी तालुक्यातील शिवांकुर विद्यालय कोंढवड येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला .या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने विद्यालयामध्ये चित्रकला कार्यानुभव ,विज्ञान प्रदर्शन तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते .

          विद्यालयातील लहान गटातील मुलांनी बाल आनंद मेळाव्यासाठी भाजीपाला,शीतपेय तसेच विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी घेऊन आले होते .तालुक्यातील आठवडा बाजार भरावा तसा हा बालगोपाळांचा बाजार विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरला होता . या बाल मेळाव्याचे उद्घाटन राहुरी तालुक्यातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ.निमसे मॅडम,डॉ .निमसे सर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शाळेचे संस्थापक बाल रोग तज्ञ डॉक्टर प्रकाश पवार,कान नाक घसा तज्ञ डॉक्टर किशोर पवार, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया जाधव तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

  

        विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .उपस्थित पालकांनी विद्यार्थ्यांकडून आणलेल्या वस्तू विकत घेऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला .आपल्याजवळील माल कसा विकावा व विकलेल्या मालाचा हिशोब कसा करावा याचे प्रत्यक्ष धडे विद्यार्थी बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने घेत होते .

         

                आपल्या जवळच्या साहित्याची विक्री झाल्यामुळे व हातात आलेल्या पैशामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता . या आनंद बाजाराची चर्चा विद्यार्थीच नव्हे तर पंचक्रोशीबरोबर राहुरी तालुक्यातही चर्चेचा विषय ठरत आहे .