लिंकिंग मटेरियल थांबवा. खते व्यापारी संघटना आक्रमक
शेवगाव तालुक्यातील कृषी सेवा दुकानदारांना रासायनिक खतासोबत घ्यावे लागत असलेल्या लिंकिंग मटेरियलमुळे सध्या दुकानदार त्रस्त आहेत. शासकीय स्तरावरून या पद्धतीचा सोक्षमोक्ष लावावा. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्या वाचून आम्हाला पर्याय उपलब्ध नाही. असा इशारा शेवगाव तालुका रासायनिक खते व्यापारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिला आहे. शेवगाव तालुक्यात एकूण 170 नोंदणीकृत कृषी सेवा दुकान आहेत. या सर्व दुकानदारांना कंपनीने दिलेली लिंकिंग मटेरियल धुळखात पडून आहेत. सखोल चौकशी अंतिम समजलेले की एका एका दुकानदाराकडे सरासरी दोन ते तीन लाखाचे लिंकिंग मटेरियल पडू नये. सरासरी शेवगाव तालुक्यात दोन कोटी पेक्षा अधिक लिंकिंग मटरेल पडून आहे.
दुकानदारांनी कंपनीकडे याची तक्रार केली मात्र आम्ही खतासोबत लिंकिंग मटेरियल देत नाही असे सांगू हात वर केले आहे मग नेमके याला जबाबदार कोण कंपनी जेवढी लिंकिंग मटेरियल बाबत जबाबदार आहे तेवढेच होलसेल ही जबाबदार आहेत. शासनाच्या खताला सबसिडी आहे मग त्याच्यासोबत लिंकिंग देण्यामागचे कारण काय. कंपनी व होलसेल नको असलेले उत्पादने खतासोबत लिंकिंग म्हणून का देतात.
शासनाचे आदेश आहेत की दुकानदाराने कुठल्याही प्रकारचे खतासोबत लिंकिंग मटेरियल देऊ नये. शेतकऱ्यांना लिंकिंग मटेरियल दिले तर दुकानदार व शेतकरी वर्गांमध्ये भांडण होतात. विविध शेतकरी संघटनेने दुकानदारांना दोषी न ठरवता या लिंकिंग मटेरियल बाबत शासनाला धारेवर धरावे. यापुढे शासनाने हा निर्णय संपावा नाहीतर जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण करू असा इशारा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिला आहे.